Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 5 >> 

1हे परमेश्वरा, माझे रडने ऐक. माझ्या कण्हणे विचारात घे.

2माझ्या देवा! माझ्या राजा! माझ्या रडण्याच्या शब्दाकडे कान दे, कारण मी तुझी प्रार्थना करतो.

3परमेश्वरा, सकाळी तू माझे रडने ऐकशील, सकाळी मी माझी प्रार्थना तुझ्याकडे व्यवस्थीत रीतीने मांडीन व वाट पाहीन.

4खचित तू असा देव आहेस, जो वाईटाला सम्मती देत नाही. वाईट लोक तुझे पाहूणे नसतील.

5गर्विष्ठ तुझ्या उपस्थीतीत उभे राहणार नाहीत, दुष्टाई करणाऱ्या सर्वांचा तू द्वेष करतो.

6खोट बोलणाऱ्याचा तू सर्वनाश करतोस; परमेश्वर हिंसक आणि कपटी मनुष्याचा तिरस्कार करतो.

7पण मी तर तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने तुझ्या घरांत प्रवेश करीन, मी पवित्र मंदिरात भीतीपोटी आणि तुझ्याबद्दलच्या आदरापोटी नमन करीन.

8हे प्रभू, माझ्या शत्रुंमुळे तू आपल्या न्यायीपनांत मला चालव, तुझे मार्ग माझ्या समोर सरळ कर.

9कारण त्यांच्या मुखात काही सत्य नाही, त्यांचे अंतर्याम दुष्टपणच आहे. त्यांचा गळा उघडे थडगे आहे, तेय आपल्या जीभेने आर्जव करतात.

10देवा, त्यांना अपराधी घोषीत कर, त्यांच्याच योजना त्यांना पडण्यास कारणीभूत ठरो. तू त्यांना त्यांच्या असंख्य गुन्ह्यांबद्दल घालवून दे. कारण त्यांनी तुझ्याविरुद्ध बंड केले आहे.

11परंतु जे सर्व तुझ्यामधे आश्रय घेतात ते हर्ष करो. ते कायमचे हर्षोनाद करो, कारण तू त्यांचे रक्षण करतोस. ज्यांना तुझे प्रीय आहे, ते तुझ्यामध्ये आनंद करो.

12कारण तूच न्यायीला आशीर्वाद देशील, हे परमेश्वरा, जसे ढालीने तसे प्रसन्नतेने तू त्याला वेढशील.



 <<  Psalms 5 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran