Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 4 >> 

1मी तुला हाक मरतो तेव्हा मला उत्तर दे, हे माझ्या न्यायीपणाच्या देवा. संकटात मी होतो तेव्हा तू मला मुक्त केले, माझ्यावर दया कर आणि माझी प्रार्थना ऐक.

2अहो लोकहो, तुम्ही किती काळ माझी कीर्ती अप्रतिष्ठेत पालटत राहणार? किती काळ तुम्ही व्यर्थतेची आवड धरणार, आणि खोट्याचा शोध घेणार? सेला

3परंतू हे जाणा की परमेश्वराने देवभिरूस आपल्या करीता वेगळे केले आहे. मी जेव्हा परमेश्वराला हाक मारीन तेव्हा तो ऐकेल.

4भीतीने थरथर कापा, परंतू पाप करु नका! तुझ्या पलंगावर आपल्या हृदयात ध्यान लावा आणि शांत राहा.

5न्यायीपणाचे यज्ञ अर्पण करा आणि परमेश्वरावर आपला विश्वास ठेवा.

6बरेच असे म्हणतात, “आम्हांला चांगुलपणा कोण दाखवेल? परमेश्वरा, आम्हांवर तुझ्या मुखाचा प्रकाश पाड.”

7त्यांच्या धनधान्याची आणि द्राक्षारसाची समृध्दी असते, तेव्हा त्यांना जो आनंद होतो त्यापेक्षा मी अधिक आनंद तू मला दिला आहे.

8मी अंथरुणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो, कारण परमेश्वरा, तुच माझे रक्षण करतोस आणि मला सुरक्षित ठेवतोस.



 <<  Psalms 4 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran