Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 39 >> 

1मी म्हणालो “मी जे बोलेन त्याबद्दल काळजी घेईन मी माझ्या जिभेला पाप करु देणार नाही.”

2मी दुष्टांबरोबर असलो की माझे तोंड बंद ठेवीन. मी बोलायला नकार दिला मी काही चांगलेसुध्दा बोललो नाही. मी फार चिडलो होतो.

3मी फार रागावलो होतो आणि मी जितका जास्त त्याचा विचार करत गेलो तितका अधिक मी रागावत गेलो. म्हणून मी काहीतरी बोललो.

4माझे काय होईल? हे परमेश्वरा, मला सांग मी किती दिवस जगेन? ते मला सांग, माझे आयुष्य किती लहान आहे ते मला कळू दे.

5परमेश्वरा, तू मला अगदी कमी आयुष्य दिलेस. माझे आयुष्य म्हणजे तुझ्या दृष्टीने काहीच नाही. प्रत्येकाचे आयुष्य केवळ ढगासारखे असते. कुणीही सदासर्वकाळ जगत नाही.

6आपण जे आयुष्य जगतो ते खोट्या प्रतिबिंबासारखे असते. आपली सगळी संकटे निष्कारणच असतात. आपण नेहमी वस्तू गोळा करीत असतो पण त्या कोणाला मिळणार आहेत ते आपल्यालामाहीत नसते.

7तेव्हा प्रभू, मला काही आशा आहे का? तूच माझी आशा आहेस!

8परमेश्वरा, तूच मला मी केलेल्या पापांपासून वाचव तू. मला दुष्ट माणसाला वागवितात तसे वागवू नकोस.

9मी माझे तोंड उघडणार नाही. मी काही बोलणार नाही. परमेश्वरा जे करायला हवे होते ते तू केलेस.

10देवा, आता मला शिक्षा करणे सोडून दे जर तू ते सोडून दिले नाहीस तर तू माझा नाश करशील.

11परमेश्वरा, तू चूक केल्याबद्दल शिक्षा करतोस. त्या रीतीने तू लोकांना जगण्याचा योग्य मार्ग दाखवतोस आमची शरीरे म्हातारी होऊन कसरीने खाल्लेल्या कापडासारखी जीर्ण होतातआमचे आयुष्य चटकन् नाहीसा होणाऱ्याढगासारखे आहे.

12परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक, मी तुझ्यासाठी जे शब्द आकांताने बोलतो ते ऐक माझे अश्रू बघ. या आयुष्यात तुझ्याबोरबर चालणारा मी केवळ एक प्रवासी आहे. माझ्या सर्व पूर्वजांप्रमाणे मी येथे केवळ थोड्याकाळासाठी राहाणार आहे.

13परमेश्वरा, माझ्याकडे बघू नकोस. मरण्याच्या आधी मला आनंदी राहू दे. मी थोड्याच वेळात जाणार आहे.



 <<  Psalms 39 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran