Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 38 >> 

1परमेश्वरा, तू माझ्यावर टीका करतोस तेव्हा रागावू नकोस तू मला वळण लावतोस तेव्हा क्रोधित होऊ नकोस.

2परमेश्वरा, तू मला इजा केलीस तुझे बाण माझ्या शरीरात खोलवर रुतले आहेत.

3तू मला शिक्षा केलीस. आता माझे सर्व शरीर दुखत आहे. मी पाप केले आणि तू मला शिक्षा केलीस. त्यामुळे माझी सर्व हाडे दुखत आहेत.

4मी दुष्कृत्य करण्याचा अपराध केला आहे आणि तो अपराध माझ्या खांद्यावर खूप मोठे ओझे असल्यासारखा आहे.

5मी मूर्खपणा केला आता मला दुर्गंधीयुक्त जखमांनी पछाडले आहे.

6मी धनुष्यासारखा वाकलो आहे आणि मी दिवसभर उदास असतो.

7मला ताप आला आहे आणि माझे संपूर्ण शरीर दुखत आहे.

8मी फार अशक्त झालो आहे मी वेदनांमुळे कण्हत आहे आणि ओरडत आहे.

9प्रभू तू माझे ओरडणे ऐकलेस माझे उसासे तुझ्यापासून लपून राहिले नाहीत.

10माझे हृदय धडधडत आहे. माझी शक्ती निघून गेली आहे आणि माझी दृष्टीही जवळ जवळ गेलेली आहे.

11माझ्या आजारपणामुळे माझे मित्र आणि शेजारी मला भेटायला येत नाहीत. माझे मित्र आप्तही माझ्याजवळ येत नाहीत.

12माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते असत्य आणि अफवा पसरवीत आहेत. ते सदैव माझ्याबद्दलच बोलत असतात.

13परंतु मी काहीही ऐकू न येणाऱ्या बहिऱ्यामाणसासारखा आहे. मी बोलू न शकणाऱ्या मुक्यामाणसासारखा आहे.

14लोक ज्याच्याबद्दल वाईट बोलतात परंतु त्याला मात्र ते ऐकू येत नाही अशा माणसासारखा मी आहे. मी वादविवाद करून माझे शत्रू चूक आहेत हे सिध्द करु शकत नाही.

15म्हणून परमेश्वरा तू माझा बचाव कर. देवा, तूच माझ्यावतीने बोल.

16मी जर काही बोललो तर माझे शत्रू मला हसतील. मी आजारी आहे हे ते बघतील आणि मला चुकाकेल्याची शिक्षा मिळत आहे असे म्हणतील.

17मी चूक केल्याबद्दल अपराधी आहे. हे मला माहीत आहे मला माझे दु:ख विसरता येत नाही.

18परमेश्वरा, मी ज्या वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल तुला सांगितले. मला माझ्या दुष्कर्माबद्दल दु:ख होत आहे.

19माझे शत्रू जिंवत आहेत व निरोगी आहेत आणि त्यांनी (माझ्याबद्दल) बरेच खोटेनाटे सांगितले आहे.

20माझे शत्रू माझ्याविरुध्द वाईट गोष्टी करतात आणि मी मात्र त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या. मी केवळ सत्कर्म करण्याचा प्रयत्न केला परंतु ते लोक माझ्यावर उलटले.

21परमेश्वरा, मला सोडू नकोस. देवा माझ्याजवळ राहा.

22लवकर ये आणि मला मदत कर. माझ्या देवा मला वाचव!



 <<  Psalms 38 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran