Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 32 >> 

1ज्याच्या अपराधांना क्षमा केली गेली आहे,ज्याचे अपराध झाकले गेले आहेत ते अाशिर्वादीत आहे.

2परमेश्वर ज्याच्या ठायी काही आपराध गणत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही तो सुखी आहे.

3मी गप्प राहिलो, तेव्हा सारा दिवस माझ्या, ओरडण्याने माझी हाडे जर्जर झाली.

4कारण रात्रंदिवस तुझा हात माझ्यावर भारी होता. उन्हाळ्यात जसे सुकून जाते, त्याप्रमाणे माझी शक्ती सुकून गेली आहे.

5तेव्हा मी परमेश्वरासमोर माझे अपराध कबूल केले, आणि मी माझा अपराध लपवला नाही, मी म्हणालो, परमेश्वरासमोर मी आपले पाप कबूल करणार, आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.

6याच कारणास्तव प्रत्येक देवभक्त तू पावशील तेव्हा तुझी प्रार्थना करो. संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.

7तू माझे लपण्याचे ठिकाण आहेस. तू मला संकटांपासून वाचवशील, विजयाच्या गीताने तू मला वेढशील.सेला

8परमेश्वर म्हणतो, “मी तुला बोध करीन आणि ज्या मार्गात, तू चालावे तो मी तूला शिकवीन. तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला बोध करीन.

9म्हणून घोड्यासारखा वा गाढवासारखा मूर्ख होऊनकोस, ज्यांना काही समजत नाही. त्यांना आवरण्यासाठी लगाम व बागदोर असलाच पाहिजे. नाहीतर ते तुमच्या जवळ येणार नाहीत.”

10वाईट लोकांना खूप दु:ख भोगावे लागेल, परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे.

11अहो न्यायी जनहो, परमेश्वराच्या ठायी आनंद व हर्ष करा. अहो सरळ जनहो हर्षाने तुम्ही जल्लोष करा.



 <<  Psalms 32 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran