Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 3 >> 

1परमेश्वरा, माझे शत्रु पुष्कळ आहेत! पुष्कळ वळले आणि माझ्यावर हल्ला केला आहे.

2“परमेश्वराकडून त्याला काहीएक मदत होणार नाही,” असे माझ्याविरूद्ध बोलणारे पुष्कळ आहेत. सेला

3परंतु हे परमेश्वरा, तू माझ्या सभोवती ढाल असा आहेस, तू माझे वैभव, आणि माझे डोके वर करणारा आहे.

4मी माझा आवाज परमेश्वराकडे उंच करीन, आणि तो मला त्याच्या डोंगरावरून उत्तर देईल. सेला

5मी अंग टाकून झोपी गेलो; मी जागा झालो, करण परमेश्वर माझे रक्षण करतो.

6जे प्रत्येकबाजूनी माझ्यासाठी टपले आहेत, त्या लोकसमुदायला मी घाबरणार नाही.

7हे परमेश्वरा उठ, माझ्या देवा, मला तार! कारण तू माझ्या सर्व शत्रूंच्या थोबाडीत मारली आहेस, तू दुष्टांचे दात मोडले आहेत.

8तारण परमेश्वरापासूनच आहे, तुझ्या लोकांवर तुझा आशिर्वाद असो. सेला



 <<  Psalms 3 >> 


Bible2india.com
© 2010-2026
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran