Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 29 >> 

1थोर जनांच्या मुलांनो, परमेश्वराला गौरव आणि सामर्थ्य आहे असे कबूल करा.

2त्याच्या पिवत्रतेला शोभून दिसेल अशा वस्रांमध्ये त्याची स्तुती करा.

3परमेश्वराचा आवाज जलांवरून ऐकण्यात आला, गौरवशाली देव गर्जत आहे, परमेश्वर पुष्कळ जलांवर गर्जत आहे.

4परमेश्वराचा आवाज सामर्थशाली आहे, परमेश्वराचा आवाज चमत्कारीक आहे.

5परमेश्वराची वाणी देवदारुवृक्षाला तोडते, परमेश्वर लबोनानच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो.

6तो लबानोनला वासरा प्रमाणे आणि तरुण बैलाप्रमाने बागडायला लावतो.

7परमेश्वराची वाणी अग्नी ज्वालासह हल्ला करतो.

8परमेश्वराचा वाणी वाळवंटाला कंपित करतो कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या वाणीने हादरते.

9परमेश्वराची वाणी हरणाला प्रसवयास लावते आणि अरण्यास बोडके करते.

10महापुरावर परमेश्वर राजा बसला आहे, आणि परमेश्वरच सर्वकालचा राजा म्हणुन बसला आहे.

11परमेश्वर त्याच्या लोकांना सामर्थ्य देतो, परमेश्वर त्याच्या माणसांना शांतीने आशीर्वाद करणार.



 <<  Psalms 29 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran