Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 28 >> 

1हे परमेश्वरा, माझ्या खडका, मी तुलाच आरोळी करतो. मला दुर्लक्षीत करू नको. जर तू मला उत्तर दिले नाहीस तर जे थडग्यात जातात त्यांसारखा मी होईल.

2जेव्हा मी तुला मदतीसाठी हाक मारतो, जेव्हा मी आपले हात तुझ्या पवित्र ठिकाणाकडे उंचावतो, तेव्हा माझी विनवणी ऐक.

3जे अन्याय करतात त्या दुष्टांबरोबर मला फरफटू नकोस. जे त्यांच्या शेजाऱ्यांसोबत शांतीने बोलतात, परंतू त्यांच्या हृदयात मात्र वाईट असते.

4त्यांच्या कृतीप्रमाणे आणि त्यांच्या दुष्टकृत्यांच्या प्रमाणे त्यांची परत फेड कर.

5कारण त्यांना परमेश्वराचे मार्ग किंवा त्याच्या हातची कृत्ये समजत नाहीत. तो त्यांना मोडनार आणि पुन्हा बांधणार नाही.

6परमेश्वराची स्तुती असो, कारण त्याने माझा विनवणीचा आवाज ऐकला.

7परमेश्वर माझी सामर्थ आणि माझी ढाल आहे. माझे हृदय त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि मला मदत करण्यात आली आहे. यास्तव माझे हृदय मोठा हर्ष करतो. आणि मी त्याची स्तुती गाऊन करणार.

8परमेश्वर त्याच्या लोकांसाठी बल असा आहे, आणि तो त्याच्या अभिषिक्तला तारणाचा आश्रय आहे.

9तुझ्या लोकांना वाचव आणि तुझ्या वतनाला आशीर्वाद दे. त्यांचा मेंढपाळ हो आणि त्यांना सर्वकाल वाट दाखव व त्यांना सदैव क्षमा कर, त्यांना उचलून घे.



 <<  Psalms 28 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran