Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 26 >> 

1परमेश्वरा, माझा न्याय कर. कारण मी प्रामाणिकपणाने चाललो आहे. परमेश्वरावर मी तुझ्यावर न डगमगता विश्वास ठेवला आहे.

2परमेश्वरा, मला पारख आणि माझे परिक्षण कर. माझ्ये हृदय आणि आतील मन निरखून पाहा.

3कारण तुझी प्रेमदया सदैव माझ्या डोळ्यांपुढे आहे, आणि तुझ्या सत्यात चाललो आहे.

4कपटी लोकांबरोबर मी सहयोगी झालो नाही, किंवा मी अप्रामाणिक लोकांत मिसळलो नाही.

5मी त्या दुष्टांच्या सभेचा तिरस्कार करतो. आणि मी दुष्टांसोबत राहत नाही.

6मी आपले हात निर्दोषात धुणार, आणि परमेश्वरा मी तुझ्या वेदीकडे वळीन.

7अशासाठी की मी तुझे स्तुती मोठ्याने करावी आणि तू केलेल्या आश्चर्याची कृत्ये सांगावी.

8परमेश्वरा, तुझे राहण्याचे घर आणि तुझे गौरव जीथे असते, ते घर मला आवडतो.

9पाप्यांसोबत किंवा रक्तपात करणाऱ्यांसोबत मला झटकून टाकू नकोस.

10त्यांच्या हातात कट आहे, आणि त्यांचा उजव्या हात लाच घेण्याने भरला आहे.

11पण मी तर प्रामाणिकपणाने वागेन, माझ्यावर दया कर आणि मला तार.

12माझा पाय सपाट ठिकाणी उभा आहे, सभेमध्ये मी परमेश्वराची तुझी स्तुती करीन.



 <<  Psalms 26 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran