Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 25 >> 

1परमेश्वरा, मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.

2माझ्या देवा, तुझ्यात माझा विश्वास आहे. मला निराश होऊ देऊ नको, माझे शत्रू माझ्यावर हर्ष न करो.

3तुझ्यावर विश्वाऱ्याची कधी निराशा होत नाही. परंतू जे कारण नसताच विश्वासघात करतात, ते लाजवले जातील.

4परमेश्वरा तुझे मार्ग मला कळव, मला तुझे मार्ग शिकव.

5तू आपल्या सत्यात मला मार्ग दाखव आणि मला शिकव. कारण तू माझा तारणारा देव आहेस मी रोज तुझ्यावर विश्वास टाकतो.

6परमेश्वरा, तुझ्या दयाळू कृत्यांची आणि प्रेमदयेची आठवण कर.

7हे परमेश्वरा, माझे तरुणपणाचे पाप आणि माझा बंडखोरपणा आठवू नको. तू आपल्या प्रेमदयेला अनुसरून आपल्या चांगुलपणामुळे मला आठव.

8परमेश्वर चांगला आणि प्रमाणिक आहे. यास्तव तो पाप्यांस मार्ग शिकवतो.

9तो नम्र जणास न्यायाने मार्गदर्शन करतो. आणि दीनांना आपला मार्ग शिकवीतो.

10जे त्याचे करार आणि वचने पाळतात त्यांच्यासाठी परमेश्वराचे मार्ग प्रेमदया व विश्वासयोग्य आहेत.

11परमेश्वरा, तुझ्या नामास्तव , माझ्या अपराधांची क्षमा कर, कारण ते खुप आहेत.

12परमेश्वराचे भय धरतो असा मनुष्य कोण आहे? प्रभू त्याला सुचना देईल, की त्याने कोणते मार्ग निवडावे.

13त्याचे जीवन चांगुलपणात जाईल, आणि त्याची संतान भूमीचे वतन पावतील.

14परमेश्वराचे मार्गदर्शन त्याचे अनुकरण करणऱ्यांवरोबर जाते. आणि तो त्याचे करार कळवतो .

15मी नेहमी परमेश्वराकडे आपली दृष्टी लावतो. कारण तो माझे पाय जाळ्यातून मुक्त करतो.

16परमेश्वरा माझ्याकडे फिर आणि माझ्यावर दया कर. कारण मी एकटा आणि पीडलेला आहे.

17माझ्या हृदयाचा त्रास वाढला आहे, संकटातून मला तू काढ.

18परमेश्वरा, माझे दु: ख आणि कष्ट बघ, माझ्या सर्व पापांची क्षमा कर.

19माझ्या सर्व शत्रूंकडे पाहा, कारण ते पुष्कळ आहेत. ते माझा कृर तिरस्काराने माझा तिरस्कार करतात.

20देवा, माझे रक्षण कर आणि मला वाचव. माझा तुझ्यावर विश्वास आहे, तेव्हा माझी निराशा करु नकोस.

21तुझा प्रामाणिकपणा आणि सरळपणा मला जपून ठेवो. कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे.

22देवा, इस्राएलाच्या लोकांचे त्यांच्या सर्व त्रासांपासून वाचव कर.



 <<  Psalms 25 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran