Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 23 >> 

1परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कशाचीही उणीव भासणार नाही.

2तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो.

3तो माझा जीव पुनर्संचयित करतो, तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो.

4मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी, मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी काठी आणि आकडी माझे सांत्वन करतात.

5तू माझ्या शंत्रूच्या समक्षतेत मज पुढे मेज तयार करतो, तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहे. माझा प्याला भरुन वाहत आहे.

6खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील, आणि परमेश्वराच्या घरात मी अनंतकाळ राहीन.



 <<  Psalms 23 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran