Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 21 >> 

1परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यात राजा हर्ष करतो! तू दिलेल्या तारणात तो किती मोठ्या मानाने आनंद करतो!

2त्याच्या हृदयाची इच्छा तू त्याला दिली आहे. आणि त्याच्या ओठांची विनंती तू आवरुन धरली नाही.

3कारण तो तूजकडे मोठे आशिर्वादा आणतो. तू त्याच्या डोक्यावर शुद्ध सोन्याचा मुकुट चढवतोस.

4त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू त्याला दिलेस, संपणारे चिरंजीव आयुष्य दिलेस.

5तुझ्या विजया मुळे त्याचे गौरव थोर आहे. तू त्याला ऐश्वर्य व वैभव बाहाल केलेस.

6कारण तू त्याला सर्वकालचा आशिर्वाद दिला आहे; तू तुझ्या समक्षतेत त्याला हर्षाने अानंदीत करतो.

7कारण राजाचा परमेश्वरावर विश्वास आहे, परात्पराच्या प्रेमदयेने तो कधीही ढळणार नाही.

8तुझा हात तुझ्या सर्व शंत्रूना पकडणार. तुझा उजवा हात जे तुझा हेवा करतात त्यांना पकडेल.

9तुझ्या क्रोधसमयी तु त्यांना जळत्या भट्टीत जाळून टाकशील. परमेश्वर त्याचा क्रोधसमयी त्यांचा नाश करणार, आणि त्याचा अग्नी त्यांंना खाऊन टाकणार.

10तू त्यांच्या संतानांचा या पृथ्वीवरुन नाश करशील.

11कारण , त्या लोकांनी तुझ्याविरुध्द वाईट आखले, त्यांना अशी योजना आखली जी त्यांच्याने यशस्वी झाली नाही.

12कारण तू त्यांना त्यांची पाठ फिरवायला लावशील. तू आपले धनुष्य त्यांच्यावर चालवण्यास सज्ज करशील.

13परमेश्वरा तू आपल्या नावने उंच्चवला जावो, आम्ही गाऊ व तुझ्या सामर्थ्याची स्तुती करू.



 <<  Psalms 21 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran