Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 17 >> 

1परमेश्वरा, न्यायासाठी माझी विनवणी ऐक. माझ्या रडण्याकडे लक्ष दे! माझ्या कपटी ओठातून जी प्रार्थना निघत नाही तिच्याकडे कान दे.

2तुझ्या उपस्थीतीतून माझा न्याय निघो; जे खरे ते तुझे डोळे पाहो.

3तू माझे हृदय पारखले आहे, रात्री तू माझी पाहणी केली, तू मला गाळून पाहीले आहे, तरी तूला काही सापडत नाही, माझे तोंड पाप करणार नाही. असा निश्चय मी केला आहे.

4मानवजातीच्या कृत्यांसंबंधीत, तुझ्या ओठांच्या वचनांकडून मी आपणाला अनिष्ट करणाऱ्यांपासून राखले आहे.

5माझ्या पावलांनी तुझे मार्ग घट्ट धरले आहेत. माझे पाय घसरले नाही.

6देवा, मी तुझ्याकडे हाक मारतो, कारण तू उत्तर देतोस, तुझे कान माझ्याकडे फिरव आणि माझ्या बोलने ऐक.

7जो तू आपल्या उजव्या हाताने तुझ्यामध्ये आश्रय घेणाऱ्यास त्यांच्या शत्रूंपासून तारतो, तो तू तुझी आश्चर्यजनक प्रेमदया दाखव.

8तुझ्या डोळ्यातल्या बुब्बुळाप्रमाणे माझे रक्षण कर. मला तुझ्या पंखाच्या सावलीखाली लपव.

9वाईटाच्या उपस्थीपासून जे माझ्यावर हल्ला करतात, माझ्या शत्रूंपासून ज्यांनी मला घेरले आहे, त्यांच्यापासून माझे रक्षण कर.

10त्यांना कोणाची दया येत नाही, त्यांचे मुख गर्वाने बोलते.

11त्यांना माझ्या पावलांना घेरले आहे, मला भुमीवर पाडायास ते आपली दृष्टी लावत आहेत.

12एखाद्याचा बळी घेण्यास उत्सूक असणाऱ्या सिंहासारखे ते आहेत, असा तरुण सिंह जो लपून बसला आहे.

13परमेश्वरा, ऊठ! त्यांच्यावर हल्ला कर! त्यांच्या तोंडावर त्यांना पाड! तुझ्या तरवारीने तू माझा जीव दुष्टापासून वाचव.

14परमेश्वरा, ज्यांचे वैभव या जीवनात एकटे आहे, आणि ज्यांचे पोट तू आपल्या धनाने भरतोस, अशा मनुष्यांपासून तू आपल्या हाताने मला वाचव. ते आपल्या संततीने तृप्त आहेत, आणि ते आपले उरलेले द्रव्य आपल्या मुलाबाळांसाठी मागे ठेवतात.

15मी न्यायीपणांत तुझे मुख पाहिन, जेव्हा मी जागा होईन, तर तुझ्या दर्शनाने मी समाधानी राहील.



 <<  Psalms 17 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran