Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 16 >> 

1देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझ्यात आश्रय घेतला आहे.

2मी परमेश्वराला म्हणालो “परमेश्वरा, तू माझा प्रभु आहेस, माझा चांगुलपणा तुझ्याशिवाय काही नाही.”

3पृथ्वीवर जे पवित्र (संत) आहेत, ते थोर जन आहेत. त्यांच्यामध्ये माझा सर्व आनंद आहे.

4जे दुसऱ्या देवाला शोधतात, त्यांची दु:खे वाढतील. त्यांच्या देवाला मी रक्तताची पेयार्पणे ओतनार नाही. किंवा त्यांचे नावसुद्धा आपल्या ओठाने घेणार नाही.

5परमेश्वरा, तू माझा निवडलेला भाग आणि माझा प्याला आहे. माझा वाटा तुच धरून ठेवतोस.

6माझ्या करता मापण-दोऱ्या सुखद ठिकाणी पडल्या आहेत. खचित माझे वतन सुंदर आहे.

7मी परमेश्वराची स्तुती करतो, ज्याने मला मार्गदर्शन केले आहे, रात्रीच्या वेळी माझे मन मला सुचना देते.

8मी परमेश्वराला नेहमी माझ्यासमोर ठेवतो आणि म्हणजे मी त्याच्या उजव्या हातातून कधीही ढळणार नाही.

9त्यामुळे माझे हृदय आनंदी आहे; माझे मन त्याला उंच करते. खचित मी सुरक्षितेत जगणार.

10कारण तू माझ्या जीवाला मृतलोकांत त्यागणार नाही, ज्याच्या जवळ तुझी प्रेमदया आहे, त्याला तू अधोलोक पाहू देणार नाही.

11तू मला जीवनाचा मार्ग शीकवला, तुझ्या उपस्थितीत विपूल हर्ष आहे, तुझ्या उजव्या हातात सुखे सर्वकाळ आहेत.



 <<  Psalms 16 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran