Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 15 >> 

1परमेश्वरा, तुझ्या पवित्र तंबूत कोण राहू शकेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील?

2जो निर्दोषपणे चालतो आणि जे चांगले ते करतो, आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो तो.

3जो आपल्या जीभेने चूगली करत नाही, किंवा दुसऱ्यांची हानी करत नाही, किंवा आपल्या शेजऱ्याचा अपमान करत नाही.

4ज्याच्या दृष्टीने देवाने नाकरलेला व्यक्ती निर्थक आहे, परंतू जो परमेश्वराचे भय धरणाऱ्यांचा सन्मान करतो, जो वचन देऊन त्याने आपली गैरसोय झाली तरी मागे हटत नाही,

5जेव्हा तो पैसे उधार देतो तेव्हा व्याज घेत नाही, जो निर्दोष लोकांविरूद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही. तो, जो ह्या गोष्टी करतो तो कधीही हलवला जाणार नाही.



 <<  Psalms 15 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran