Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 145 >> 

1माझ्या देवा, हे राजा, मी तुझी खूप स्तुती करीन; मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचा धन्यवाद करीन.

2प्रत्येक दिवशी मी तुझा धन्यवाद करीन. मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचे स्तवन करीन.

3परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे; त्याची महानता अनाकलनीय आहे.

4एक पिढी दुसऱ्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील आणि तुझ्या पराक्रमी कृतीचे वर्णन करतील.

5तुझ्या राजवैभवाचा गौरवयुक्त प्रताप आणि तुझी अद्भुत कार्ये यांचे मी मनन करीन.

6ते तुझ्या भयावह कृत्यांच्या पराक्रमाविषयी बोलतील. मी तुझा महिमा वर्णीन.

7ते तुझ्या विपुल अशा चांगुलपणाविषयी सांगतील आणि तुझ्या न्यायीपणाबद्दल गाणे गातील.

8परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे, तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे.

9परमेश्वर सर्वांना चांगला आहे; त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.

10हे परमेश्वरा, तू केलेली सर्व कृत्ये तुला धन्यवाद देतील; तुझे भक्त तुला धन्यवाद देतील.

11ते तुझ्या राज्याच्या गौरवाविषयी सांगतील आणि तुझ्या सामर्थ्याविषयी बोलतील.

12हे यासाठी की,त्यांनी देवाची पराक्रमी कृत्ये आणि त्याच्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस कळवावी.

13तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. आणि तुझा राज्यधिकार सर्व पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे.

14पडत असलेल्या सर्वांना परमेश्वर आधार देतो आणि वाकलेल्या सर्वांना तो उभे करतो.

15सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात. आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस.

16तू आपला हात उघडून आणि प्रत्येक जीवंत प्राण्याची इच्छा तृप्त करतो.

17परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे आणि तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे.

18जे कोणी त्याचा धावा करतात, जे सत्यतेने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.

19तो आपला आदर करणाऱ्याची इच्छा पुरवतो; तो त्यांची आरोळी ऐकून आणि त्यांना वाचवतो.

20परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो. परंतु तो वाईटांचा नाश करतो.

21माझे मुख परमेश्वराची स्तुती करीन. सर्व मानवजात त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद सदासर्वकाळ व कायम करो .



 <<  Psalms 145 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran