Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 144 >> 

1परमेश्वर माझा खडक आहे, जो माझ्या हाताला युद्ध करण्यास आणि माझ्या बोटास लढाई करण्यास शिक्षण देतो.

2तो माझा दयानिधी व माझा दुर्ग, माझा उंच बुरुज आणि मला सोडवणारा, माझी ढाल आहे आणि मी त्याचा आश्रय घेतो; तो माझ्या लोकांना माझ्या सत्तेखाली आणतो.

3हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावी? किंवा मनुष्य तो काय की तू त्याच्याविषयी विचार करावा?

4मनुष्य एका श्वासासारखा आहे; त्याचे दिवस नाहीशा होणाऱ्या सावलीसारखे आहेत.

5हे परमेश्वरा, तू आपले आकाश लववून खाली उतर; पर्वतांना स्पर्श कर आणि त्यातून धूर येऊ दे.

6विजांचे लखलखाट पाठवून आणि माझ्या शत्रूला पांगवून टाक; तुझे बाण मारून आणि त्यांचा पराभव करून त्यांना माघारी पाठव.

7वरून आपले हात लांब कर; महापुरातून, ह्या परक्यांच्या हातून, मला सोडवून वाचव.

8त्यांचे मुख असत्य बोलते, आणि त्यांचा उजवा हात असत्याचा आहे.

9हे देवा, मी तुला नवे गाणे गाईन. दशतंतु वीणेवर मी तुझी स्तवने गाईन;

10तूच राजांना तारण देणारा आहे; तूच आपला सेवक दावीद याला दुष्टाच्या तलवारीपासून वाचवले.

11मला या परक्यांच्या हातातून मुक्त कर व मला वाचव. त्यांचे मुख असत्य बोलते; आणि त्यांचा उजवा हात असत्याचा आहे.

12आमची मुले आपल्या तारुण्याच्या भरांत उंच वाढलेल्या रोपांसाखी आहेत. आमच्या मुली राजवाड्याच्या कोपऱ्याच्या कोरलेल्या खांबाप्रमाणे आहेत.

13आमची कोठारे प्रत्येक प्रकारच्या वस्तुंनी भरलेली असावीत. आणि आमच्या शेतात आमची मेंढरे सहस्रपट,दशसहस्रपट वाढावीत.

14मग आमचे बैल लादलेले असावेत; दरोडे, धरपकड व आकांत हे आमच्या रस्त्यात नसावेत;

15ज्यांना असे आशीर्वाद आहेत ते लोक आशीर्वादित आहेत; ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते आनंदी आहेत.



 <<  Psalms 144 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran