Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 143 >> 

1हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक;माझ्या विनणीकडे कान दे. कारण तू आपल्या विश्वासाने आणि न्यायीपणाने मला उत्तर दे.

2तू आपल्या सेवकाबरोबर न्यायनिवाड्यात प्रवेश करु नकोस. कारण तुझ्या दृष्टीने कोणीहि नीतिमान नाही.

3शत्रू माझ्या जिवाचा पाठलाग करीत आहेत; त्यांनी माझे जीवन धुळीस मिळवले आहे; पुरातन काळच्या मेलेल्यासारखे त्याने मला अंधकाराच्या स्थळी राहण्यास लाविले आहे.

4माझ्याठायी माझा आत्मा व्याकुळ झाला आहे; माझे हृदय उदास झाले आहे.

5मी पूर्वीचे दिवस आठवतो; मी तुझ्या सर्व कृत्यांवर मनन करतो; तुझ्या हाताने सिद्धीस नेलेल्या कामावर विचार करतो.

6मी प्रार्थनेत आपले हात तुझ्यापुढे पसरतो; शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तहानेला झाला आहे

7हे परमेश्वरा, त्वरा करून मला उत्तर दे कारण माझा आत्मा क्षीण झाला आहे. माझ्यापासून तू आपले मुख लपवू नकोस, किंवा लपवशील तर मी गर्तेत उतरल्यासारखा होईन.

8सकाळी मला तुझ्या वात्सल्याचे शब्द ऐकू दे, कारण मी तुझ्यावर भरवसा ठेवला आहे. ज्या मार्गाने मी चालावे तो मला दाखव, कारण मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.

9हे परमेश्वरा, माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर. मी लपण्यासाठी तुझ्याकडे धाव घेतो.

10मला तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास शिकव, कारण तू माझा देव आहेस. तुझा चांगला आत्मा मला सरळपणाच्या देशात नेवो.

11हे परमेश्वरा, तुझ्या नावाकरता मला सजीव कर. तुझ्या न्यायीपणाने माझा जीव संकटातून वर काढ.

12तू आपल्या दयेने माझ्या शत्रूंचा नायनाट कर आणि माझ्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश कर कारण मी तुझा दास आहे.



 <<  Psalms 143 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran