Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 141 >> 

1हे परमेश्वरा, मी तुला मोठ्याने ओरडून हाक मारतो; माझ्याकडे त्वरेने ये. जेव्हा मी तुला हाक मारतो तेव्हा माझे ऐक.

2माझी प्रार्थना तुझ्यासमोर धुपाप्रमाणे, ती माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो.

3हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव; माझ्या ओठांचे द्वार सांभाळ.

4अन्याय करणाऱ्या माणसाबरोबर मी त्याच्या पापमय कार्यात सहभागी होऊ नये किंवा माझ्या मनाने कोणत्याहि वाईट गोष्टींची इच्छा करू नये; त्यांची मिष्टान्ने खाऊ देऊ नकोस.

5नीतिमान माणूस मला तडाखा मारो; ती मला दयाच होईल. तो मला दुरुस्त करो. ते माझ्या डोक्यावर तेलासारखे होईल. माझे डोके ते स्विकारण्यास नकार देणार नाही. परंतु माझ्या प्रार्थना नेहमी दुष्ट लोकांच्या कृत्याविरूद्ध आहेत.

6त्यांच्या अधिपतींना कड्यावरून खाली लोटून दिले आहे; ते माझे वचने ऐकतील कारण ती गोड आहेत.

7जमीन नांगरताना आणि ढेकळे फोडताना जशी माती विखरली जाते, तशीच आमची हाडे अधोलोकांच्या तोंडाशी विखरली गेली आहेत.

8तरी हे प्रभु परमेश्वरा, खचित माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत; मी तुझ्यात आश्रय घेतला आहे;माझा जीव निराधार सोडू नकोस.

9त्यांनी माझ्यासाठी जो पाश रचला आहे त्यातून व दुष्कर्म करणाऱ्यांच्या सापळ्यातून माझे संरक्षण कर.

10दुष्ट आपल्या स्वतःच्या जाळ्यात पडोत मी त्यातून निसटून जाईन.



 <<  Psalms 141 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran