Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 138 >> 

1मी अगदी मनापासून तुझी उपकारस्तुती करीन; मी देवांसमोर तुझे स्तोत्रे गाईन.

2मी तुझ्या पवित्र मंदिराकडे नतमस्तक होऊन आणि मी तुझ्या कराराची विश्वासयोग्यता आणि तुझ्या सत्याबद्दल तुझ्या नावाची उपकारस्तुती करीन. तू आपल्या संपूर्ण नावापेक्षा आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहेस.

3मी तुला हाक मारली त्याच दिवशी तू मला उत्तर दिलेस. तू मला उत्तेजन दिले आणि तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले.

4हे परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझी उपकारस्तुती करतील, कारण ते तुझ्या मुखातील शब्द ऐकतील.

5खरोखर,ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील कारण परमेश्वराचा महिमा अगाध आहे.

6कारण परमेश्वर उंच आहे तरी तो दीनांकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो.

7जरी मी संकटांमध्ये चाललो तरी तू मला नवजीवन देतो. माझ्या शत्रूंच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस; आणि तुझा उजवा हात माझे तारण करतो.

8परमेश्वर माझ्याबरोबर शेवटपर्यत आहे; हे परमेश्वरा, तुझी कराराची विश्वासयोग्यता सदासर्वकाळ आहे. तू आपल्या हातची कामे सोडून देऊ नकोस.



 <<  Psalms 138 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran