Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 137 >> 

1आम्ही बाबेलाच्या नद्यांजवळ खाली बसलो आणि जेव्हा आम्ही सियोनेविषयी विचार केला तेव्हा रडलो.

2तेथील वाळुंजावर आम्ही आमच्या वीणा टांगल्या.

3तेथे आम्हाला पकडणाऱ्यांनी आम्हाला गाणी गावयाला सांगितले आणि आमची थट्टा करणाऱ्यांनी आम्ही त्यांच्यासाठी आनंद करावा म्हणून आम्हास म्हणाले, सीयोनाच्या गाण्यांतले एखादे गाणे आम्हांला गाऊन दाखवा.

4परक्या देशात आम्ही परमेश्वराचे गाणे कसे गावे?

5हे यरुशलेमे, मी जर तुला विसरलो, तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो.

6जर मी तुला विसरलो, जर मी यरुशलेमेला आपल्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानले नाही तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.

7हे परमेश्वरा,अदोमीविरूद्ध यरुशलेमेच्या त्या दिवसाची आठवण कर, ते म्हणाले,ती पाडून टाका, पायापर्यत पाडून टाका.

8हे बाबेलाच्या कन्ये,तू लवकरच नाश होणार आहेस, कारण जसे तू आम्हाला केले तसे जो तुला परत करील तो आशीर्वादित आहे.

9जो तुझी बालके घेऊन आणि त्यांना खडकावर आपटून ठार मारतो तो आशीर्वादित होईल.



 <<  Psalms 137 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran