Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 135 >> 

1परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो, तुम्ही त्याची स्तुती करा.

2परमेश्वराच्या घरात उभे राहाणाऱ्यांनो, आमच्या देवाच्या घराच्या अंगणात उभे राहाणाऱ्यांनो, तुम्ही त्याची स्तुती करा.

3परमेश्वराची स्तुती करा, कारण तो चांगला आहे; त्याच्या नावाचे गुणगान करा कारण ते करणे आनंददायक आहे.

4कारण परमेश्वराने याकोबाला आपल्यासाठी निवडले आहे, इस्राएल त्याच्या मालमत्तेप्रमाणे आहे.

5परमेश्वर महान आहे हे मला माहीत आहे, आमचा प्रभु सर्व देवांच्या वर आहे.

6परमेश्वराची जी इच्छा आहे तसे तो आकाशात,पृथ्वीवर,समुद्रात आणि खोल महासागरात करतो.

7तो पृथ्वीच्या शेवटापासून ढग वर चढवतो. तो पावसासाठी विजा निर्माण करतो आणि आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो.

8त्याने मिसराचे माणसांचे आणि प्राण्यांचे दोघांचे पहिले जन्मलेले मारून टाकले.

9हे मिसरा, त्याने तुझ्यामध्ये,फारो व त्याचे सर्व सेवक यांच्याविरूद्ध चिन्ह व चमत्कार पाठवले.

10त्याने पुष्कळ राष्ट्रांवर हल्ला केला आणि शक्तिमान राजांना मारून टाकले,

11अमोऱ्यांचा राजा सिहोन व बाशानाचा राजा ओग आणि कनानामधल्या सर्व राज्यांचा पराभव केला.

12त्यांचा देश त्याने वतन असा दिला, आपल्या इस्राएल लोकांसाठी वतन करून दिला.

13हे परमेश्वरा, तुझे नाव सर्वकाळ टिकून राहिल, हे परमेश्वरा, तुझी किर्ती सर्व पिढ्यानपिढ्या राहील.

14कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील आणि त्याला आपल्या सेवकांचा कळवळा येईल.

15राष्ट्रांच्या मूर्ति सोन्या व रुप्याच्या आहेत, त्या माणसाच्या हाताचे काम आहेत.

16त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण त्या बोलत नाहीत; त्यांना डोळे आहेत पण त्या पाहत नाहीत.

17त्यांना कान आहेत, पण त्या ऐकत नाहीत, त्यांच्या मुखात मुळीच श्वास नाही.

18जे त्या बनवितात, जे प्रत्येकजण त्याच्यावर भरवसा ठेवणारे त्यांच्यासारख्याच त्या आहेत.

19हे इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा; अहरोनाच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा.

20लेवीच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा. परमेश्वराचा आदर करणाऱ्यांनो परमेश्वराचा धन्यवाद करा.

21जो परमेश्वर यरुशलेमेत राहतो त्याचा धन्यवाद सियोनेत होवो. परमेश्वराची स्तुती करा.



 <<  Psalms 135 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran