Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 13 >> 

1परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरुन जाणार आहेस? किती वेळ तू आपले मुख माझ्यापासून लपवणार आहे?

2सारा दिवस माझ्या हृदयात दु:ख असता, किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू? किती काळ माझे शत्रू माझ्यावर उंचावला जाईल?

3परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ, माझ्या प्रश्नांचे उत्तर दे. माझे डोळे प्रकाशीत कर, नाहीतर मी मरणात झोपेन.

4मी त्याच्यावर विजय मिळवला” असे माझ्या शत्रूला बोलू देऊ नको. म्हणजे माझा शत्रू असे म्हणणार की, मी त्यावर वियम मिळवीला आहे. नाहीतर माझे शत्रू मी खाली आणल्या गेलो म्हणून उल्लसतील.

5परंतू मी तुझ्या प्रेमदयेवर विश्वास ठेवला आहे. माझे हृदय तुझ्या तराणात हर्ष पावते.

6परमेश्वरासाठी गाईन, कारण त्याने मला फार उदारपणे वागवले आहे.



 <<  Psalms 13 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran