Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 129 >> 

1“इस्राएलाने आता म्हणावे, माझ्या तरुणपणापासून त्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे.

2त्यांनी माझ्या तरुणपणापासून माझ्यावर हल्ला केला, तरी ते मला पराजीत करू शकले नाहीत.

3नांगरणाऱ्यांनी माझ्या पाठीवर नांगरले; त्यांनी आपली तासे लांब केली.

4परमेश्वर न्यायी आहे; त्याने दुष्टांच्या दोऱ्या कापून टाकल्या आहेत.

5जे सियोनेचा तिरस्कार करतात, ते सर्व लज्जित होवोत आणि माघारी फिरवले जावोत.

6ते छपरावरचे गवत वाढण्या आधीच सुकून जाते त्यासारखे होवोत.

7त्याने कापणी करणारा आपली मूठ भरीत नाही किंवा पेंढ्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही.

8त्यांच्या जवळून येणारेजाणारे म्हणत नाही, की, “परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यावर असो; परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो.”



 <<  Psalms 129 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran