Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 126 >> 

1सीयोनेतून धरून नेलेल्यांना परमेश्वराने माघारी आणले, तेव्हा आम्हाला स्वप्नासारखे वाटले.

2मग आमचे मुख हास्याने आणि आमची जीभ गायनाने भरली. नंतर ते राष्ट्रांमध्ये म्हणू लागले परमेश्वराने ह्यांच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत.

3परमेश्वराने आमच्यासाठी महानगोष्टी केल्या आहेत; आम्ही किती हर्षित झालो आहोत!

4परमेश्वरा, नेगेब येथील प्रवाहाप्रमाणे आम्हाला बंदिवासातून परत आण.

5जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतील ते हर्षाने आरोळी मारून कापणी करतील.

6जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो, तो पुन्हा हर्षाने आरोळी मारून आपल्या पेंढ्या आपल्याबरोबर घेऊन येईल.



 <<  Psalms 126 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran