Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 124 >> 

1आता इस्राएलाने म्हणावे,जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता,

2जेव्हा लोक आमच्याविरूद्ध उठले, तेव्हा जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता तर आमच्या बाजूला कोण असते,

3जेव्हा त्यांचा क्रोध आमच्याविरूद्ध पेटला त्यावेळी त्यांनी आम्हाला जिवंत गिळून टाकले असते.

4जलांनी आम्हाला धुवून दूर नेले असते; प्रवाहाने आम्हाला पूर्ण झाकले असते.

5मग खवळलेल्या जलांनी आम्हाला बुडवले असते.

6परमेश्वराचा धन्यवाद होवो, त्याने आम्हाला त्याच्या दातांनी फाडू दिले नाही.

7आमचा जीव पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशातून मुक्त झाला आहे; पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत.

8पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण करणारा परमेश्वर त्याच्या नावामुळे आम्हाला मदत मिळते.



 <<  Psalms 124 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran