Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 123 >> 

1स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या, तुझ्याकडे मी आपली दृष्टी वर लावतो.

2पाहा,जसे दासाचे डोळे आपल्या मालकाच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या मालकिणीच्या हाताकडे असतात, तसे आमचे डोळे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यत त्याच्याकडे लागलेले असतात.

3हे परमेश्वरा,आमच्यावर दया कर,आमच्यावर दया कर, कारण आम्ही अपमानाने भरलो आहोत.

4परमेश्वरा, आमच्याशी दयाळू राहा. खूप काळापासून आमचा अपमान होत आला आहे म्हणून तू दयावंत हो. (123-5) सुखवस्तु लोकांनी केलेली थट्टा आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी आमच्या जिवाचा पुरेपुरे करून टाकले आहे.



 <<  Psalms 123 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran