Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 116 >> 

1मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी वाणी आणि माझ्या विनंत्या दयेसाठी ऐकतो.

2कारण तो माझे ऐकतो, म्हणून मी जिवंत आहे तोपर्यत मी त्याला हाक मारील.

3मृत्यूचे दोर माझ्याभोवती आवळले, आणि मला अधोलोकांच्या यातना झाल्या, संकट व क्लेश मला झाले.

4नंतर मी परमेश्वराच्या नावाचा धावा केला, “हे परमेश्वरा, मी तुला विनंती करतो, मला वाचव.”

5परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे; आमचा देव कनवाळू आहे.

6परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो; मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझे तारण केले.

7हे माझ्या जिवा तू आपल्या विश्रामस्थानी परत ये; कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत.

8तू माझा जीव मृत्यूपासून, माझे डोळे अश्रूपासून आणि माझे पाय अडखळण्यापासून मुक्त केले आहेत.

9जीवंताच्या भूमीत परमेश्वराची सेवा करणे मी चालूच ठेवीन.

10मी फार पीडित आहे असे जेव्हा मी म्हणालो, तरी माझा त्याच्यावर विश्वास आहे.

11मी अविचाराने म्हणालो की, सगळे माणसे खोटारडे आहेत.

12परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराची मी कशी परतफेड करू?

13मी तारणाचा प्याला उंचावून आणि परमेश्वराच्या नावाने हाक मारीन.

14त्याच्या सर्व लोकांसमोर मी परमेश्वराला केलेले नवस पूर्ण करीन.

15परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्ताचा मृत्यू अमोल आहे.

16हे परमेश्वरा,मी खरोखर तुझा सेवक आहे; मी तुझा सेवक, तुझ्या दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे; माझी बंधने तू सोडली आहेस.

17मी तुला उपकाराचा यज्ञ अर्पण करीन आणि मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.

18मी त्याच्या सर्व लोकांसमोर परमेश्वराला केलेले नवस पूर्ण करीन.

19परमेश्वराच्या घराच्या अंगणात, यरुशलेमा तुझ्यामध्ये ते फेडीन. परमेश्वराची स्तुती करा.



 <<  Psalms 116 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran