Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 115 >> 

1हे परमेश्वरा, आमचे नको. आमचे नको, तर आपल्या नावाचा सन्मान कर, कारण तू दयाळू आणि सत्य आहेस.

2ह्यांचा देव कोठे आहे, असे राष्ट्रांनी का म्हणावे?

3आमचा देव स्वर्गात आहे; त्याला जे आवडते ते तो करतो.

4राष्ट्रांच्या मूर्ति सोन्याच्या व रुप्याच्या आहेत. त्या मनुष्यांच्या हातचे काम आहेत.

5त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत, पण त्यांना बघता येत नाही.

6त्यांना कान आहेत, पण त्यांना ऐकू येत नाही, त्यांना नाक आहे, पण त्यांना वास घेता येत नाही.

7त्यांना हात आहेत, पण त्यांना स्पर्श करता येत नाही. त्यांना पाय आहेत पण त्या चालू शकत नाही; किंवा त्यांच्या मुखाने त्यांना बोलता येत नाही.

8जे त्यांना बनवितात त्यांच्याप्रमाणेच त्यांच्यावर भरवसा ठेवणारा प्रत्येकजन आहे.

9हे इस्राएला, परमेश्वरावर विश्वास ठेव. तो त्यांचे सहाय्य आणि ढाल आहे.

10हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वरावर विश्वास ठेव; तोच त्याचे सहाय्य आणि ढाल आहे.

11अहो परमेश्वराचा आदर करणाऱ्यांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा; तोच त्यांचे सहाय्य आणि ढाल आहे.

12परमेश्वराने आमची दखल घेतली आहे आणि आम्हाला आशीर्वाद देईल. तो इस्राएलाच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल. तो अहरोनाच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल.

13जे परमेश्वराचा आदर करतात त्या तरुण आणि वृद्ध या दोघांना तो आशीर्वाद देईल.

14परमेश्वर तुम्हाला अधिकाधिक वाढवो, तो तुमची आणि तुमच्या वंशजांची वाढ करो.

15आकाश व पृथ्वी ही निर्माण करणाऱ्या परमेश्वराचा तुम्हाला आशीर्वाद असो.

16स्वर्ग तर परमेश्वराचा आहे; पण त्यांने मानवजातीला पृथ्वी दिली आहे.

17मेलेले म्हणजे निवांतस्थानी उतरलेले कोणीहि परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.

18पण आम्ही आता आणि सदासर्वकाळ परमेश्वराला धन्यवाद देत राहू. परमेश्वराची स्तुती करा.



 <<  Psalms 115 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran