Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 110 >> 

1माझ्या प्रभुला परमेश्वर म्हणतो, “ तुझ्या शत्रूंना तुझे पादासन करीपर्यत माझ्या उजव्या बाजूला बस.”

2परमेश्वर म्हणतो, तुझ्या सामर्थ्याची काठी सियोनेपासून चालवील; तू आपल्या शत्रूंवर राज्य करशील.

3तुझे वैभवशाली सामर्थ्य दाखवण्याच्या दिवशी पवित्र पर्वतावर तुझे लोक स्वसंतोषाने पुढे होतात, पहाटेच्या उदरातून आलेले दवासारखे तुझे तरुण तुला आहेत.

4परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि तो बदलणार नाही. “तू मलकीसदेकाच्या प्रकाराप्रमाणे तू सर्वकाळ याजक आहेस.”

5प्रभु तुझ्या उजव्या हाताला आहे. तो आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा वध करील.

6तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील; तो प्रेतांनी दऱ्या भरील; तो अनेक राष्ट्रात नेत्यांना मारील.

7तो मार्गाने चालत असता झऱ्यातले पाणी पिईल, आणि मग तो विजयानंतर आपले डोके वर उचलेल.



 <<  Psalms 110 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran