Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 11 >> 

1परमेश्वरामध्ये मी आश्रय घेतो; पक्ष्यासरखे डोंगराकडे उडून जा, असे तुम्ही माझ्या जीवाला कसे म्हणता?

2कारण पाहा! सरळ हृदयाच्यांना अंधारात मारावे म्हणून, दुष्ट आपला धनुष्य वाकवतात आणि आपला तीर दोरीला लावून तयार करतात.

3कारण जर पायेच नष्ट केले, तर न्यायी काय करणार?

4परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरात आहे; त्याचे डोळे पाहतात, त्याचे डोळे मनुष्याच्या संतानास पारखतात.

5परमेश्वर नितीमानाची पारख करतो. परंतू जे दुष्ट व हिंसा करतात त्यांचा तो द्वेष करतो.

6तो दुष्टवर जळते निखारे आणि गंधकाचा वर्षाव करीन, होरपळून टाकणारा हाच त्याच्या कपातील त्यांचा वाटा असेल.

7कारण परमेश्वर नितीमान आहे आणि त्याला न्यायीपण प्रीय आहे. सरळ त्याचे मुख पाहतील.



 <<  Psalms 11 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran