Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 103 >> 

1हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, आणि माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर.

2हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस.

3तो तुझ्या सर्व पापांची क्षमा करतो; तो तुझे सर्व आजार बरे करतो.

4तो तुझे आयुष्य नाशापासून खंडून घेतो; तो तुला आपल्या विश्वासाच्या कराराने आणि हळूवार करुणेच्या कृतीने मुकुट घालतो.

5तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे पुन्हा नवे होते.

6जे सर्व अन्यायाने पीडलेले आहेत त्यांच्यासाठी परमेश्वर नीतीचे आणि न्यायाची कृत्ये करतो.

7त्याने मोशेला आपले मार्ग, इस्राएल वंशजांना आपली कृत्यांची ओळख करून दिली.

8परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे; तो सहनशील आहे;तो महान कराराचा विश्वासूपणा आहे.

9तो नेहमीच शिक्षा करणार नाही; तो नेहमीच रागावणार नाही.

10तो आम्हांशी आमच्या पापास अनुरूप असे वागला नाही किंवा आमच्या पापाला साजेसे प्रतिफळ दिले नाही.

11कारण जसे पृथ्वीच्या वरती आकाश आहे, तसे त्याचे जे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया आहे.

12जसे पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे, तसे त्याने आमच्या पापाचे दोष आम्हापासून काढून टाकले आहेत.

13जसा पिता आपल्या मुलांवर करुणा करतो, तसा परमेश्वर आपला सन्मान करतात त्यावर करुणा करतो.

14कारण आम्ही कसे अस्तित्वात आलो हे तो जाणतो, आम्ही धुळ आहोत हे त्याला माहित आहे.

15मनुष्याच्या आयुष्याचे दिवस गवताप्रमाणे आहेत; शेतातील फुलासारखा तो फोफावतो.

16वारा त्यावरून वाहून जातो आणि ते नाहीसे होते, आणि कोणीहि सांगू शकत नाही की, ते एकदा कोठे वाढत होते.

17परंतु परमेश्वराची करार विश्वासनियता त्याचा आदर करणाऱ्यावर अनादिकालापासून अनंतकाळापर्यत असते. त्याचा न्यायीपणाचा विस्तार त्यांच्या वंशजापर्यत होतो.

18जे त्याचा करार पाळतात आणि त्यांच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो.

19परमेश्वराने आपले सिंहासन स्वर्गात स्थापले आहे आणि त्याचे राज्य प्रत्येकावर सत्ता गाजवते.

20अहो जे तुम्ही त्याचे दूत आहात, ज्या तुम्हाला महान सामर्थ्य आहे आणि जे त्याचे शब्द ऐकून त्याच्या आज्ञांचे आज्ञाधारकपणे पालन करता,ते तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा.

21अहो परमेश्वराच्या, सर्व सैन्यांनो जे तुम्ही त्याचे सेवक आहात ते तुम्ही त्याची इच्छा सिद्धीस नेता ते तुम्ही धन्यवादित आहात.

22परमेश्वराच्या राज्यातील सर्व ठिकाणातील, त्याच्या सर्व प्राण्यांनो त्याचा धन्यवाद करा; हे माझ्या जिवा परमेश्वराचा धन्यवाद करा.



 <<  Psalms 103 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran