Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Psalms 101 >> 

1मी प्रेम आणि न्यायाचे गीत गाईन; हे परमेश्वरा, मी स्तुति गाईन;

2मी सचोटीच्या मार्गाने चालेन. अहा,तू माझ्याकडे कधी येशील? मी माझ्या घरात सचोटीने चालेन.

3मी आपल्या डोळ्यासमोर अनुचित गोष्ट ठेवणार नाही; कफल्लक वाईटाचा द्वेष करतो; तो मला बिलगणार नाही.

4हेकेखोर लोक मला सोडतील; मी वाईटाशी निष्ठावान राहणार नाही.

5आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे निंदानालस्ती करण्याऱ्याचा मी नाश करीन. जो कोणी गर्विष्ठ चालीरीतीचा आणि उर्मट वागणूकीचा आहे त्याचे मी सहन करणार नाही.

6देशातले विश्वासू यांनी माझ्याजवळ बसावे म्हणून माझी नजर त्यांच्यावर राहील; जो सचोटीच्या मार्गाने चालतो तोच माझा सेवक होईल.

7कपट करणारे लोक माझ्या घरात राहणार नाहीत; लबाडाचे माझ्या डोळ्यापुढे स्वागत होणार नाही.

8देशातल्या सर्व वाईटांचा मी रोज सकाळी नाश करत जाईल; मी सर्व वाईट करणाऱ्यांना नगरातून काढून टाकील.



 <<  Psalms 101 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran