Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Hosea 8 >> 

1“मुखाला तुतारी लाव, यहोवाच्या, घरावर गरुड येत आहे, हे यासाठी घडत् आहे कारण लोकांनी माझा करार मोडून माझ्या नियम शास्त्राच्या विरोधात बंड केला आहे.

2ते माझा धावा करतात, माझ्या देवा, आम्ही इस्त्राएली तुला जाणतो”

3पण इस्त्राएलाने जे चांगले ते नाकारले आहे, आणि शत्रु त्याचा पाठलाग करेल.

4त्यांनी राजे नेमले. पण माझ्या द्वारे नाही, त्यांनी राजपुत्र स्थापले आहे, पण माझे ज्ञान न घ्ज्ञेता त्यांनी, आपले सोने व चांदी घेऊन, स्वत:साठी मुर्त्या बनविल्या आहेत. त्यानेच ते नाश पावतील.

5संदेष्टा म्हणतो, हे शमरोना तुझे वासरु त्याने नाकारले आहे, यहोवा म्हणतो या लोकांविरुध्द माझा राग पेटेल, किती वेळ ते अशुध्द राहणार?

6कारण ही मूर्ती इस्त्राएलातुन आली, कारागिराने बनवली, ती देव नाही शमरोनाच्या वासराचे तुकडे होतील.

7कारण लोक वारा पेरतात आणि वावटळीची कापणी करता, उभ्या पिकाला कणीस नाही, ते धान्याचे पिठ उत्पन्न करणार नाही, आणि जर त्याची पूर्ण वाढ झाली तरी परके त्याला गिळून टाकतील.

8इस्त्राएलास गिळले आहे, आता ते देशामध्ये बिन कामाची लबाडी करतात.

9कारण ते अश्शूरास रानगाढवासारखे गेले, एफ्राहमाने आपल्यासाठी प्रियकर नेमले आहेत.

10जरी त्यांनी देशात प्रियकर नेमले, मी त्यांना आता एकत्र करीन. राजे आणि पुढारी यांच्या दबावामुळे ते कमी होतील.

11कारण एफ्राहमाने पापबलींसाठी आपल्या विद्या पाठवल्या आहेत, पण त्या वंद्या पाप करण्याचे कारण ठरल्या आहेत.

12मी असंख्य वेळा माझे नियमशास्त्र त्यांच्यासाठी लिहीले, पण ते त्याकडे अनोळख्या सारखे पाहतात.

13मला अर्पणे करावी म्हणून ते मास देतात व खातात, पण मी यहोवा, ते स्विकारत नाही. आता मी त्यांचे पाप स्मरण करून त्यांना शासन करणार ते मिसर देशात परत जातील.

14इस्त्राएलाने आपल्या निर्माण कर्त्यांचा विसर पडला आहे आणि महल बांधले आहेत, यहूदाने तटबंदीची नगरे वसवली आहेत, पण मी त्याच्या शहरावर अग्नी पाठवीन, तो त्याची तटबंदी नष्ट करून टाकेल.



 <<  Hosea 8 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran