Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Hosea 7 >> 

1जेव्हा मी इस्त्राएलास आरोग्य देऊ पाहतो, तेव्हा एफ्राहमाचे पाप आणि शमसेनाची अधमता उघड होते ते कट रचतात, चोर आत शिरतो आणि रस्त्यावर लुटारुंची टोळी हल्ला करते.

2मी त्यांचे दुराचार आठवतो याची त्यांना त्यांच्या हृदयात जाणीवही नाही, त्यांच्या कृत्यांनी त्यांना घेरले आहे, ते माझ्या मुखासमोर आहे.

3ते आपल्या वाईटाने राजाला, आणि लबाडीने अधिकाऱ्यास खुष करतात.

4ते सर्व व्यभिचारी आहेत जसा भटारी भट्टी पेटवून कनिक भिजवतो व ते खमिराने फुगत नाही तसे ते आहेत.

5राजाच्या शुभ दिवशी अधिकारी मद्य पिऊन मस्त झाले मग त्याने आपला हात थट्टा करणाऱ्यांच्या हाती दिला.

6भट्टीसारख्या हृदयाने ते कपटी आणि फसव्या योजना करतात. त्यांचा राग रात्रभर अग्नीसारखा धुमसतो, आणि सकाळी धगधगणाऱ्या आगेसारखा जळतो.

7ते सर्व भट्टी सारखे गरम आहेत, ते आपल्या राज्य कर्त्यांस गिळून टाकतात, त्यांचे सर्व राजे पतन पावले आहे, त्यांच्यातील कोणीही माझा धावा करीत नाही.

8एफ्राहम त्या लोकांसोबत मिसळतो, एफ्राहम न पलटलेल्या भाकरीसारखा झाला आहे.

9परक्यांनी त्याची ताकद गिळली आहे पण त्याला हे ठाऊक नाही त्याचे काही केस पांढरे झाले आहेत, पण ते त्यास माहित नाही.

10इस्त्राएलाचा गर्व त्याच्या विरोधात साक्ष देतो, इतके असूनही ते आपला देव यहोवाकडे वळत नाही, हे करण्यापेक्षा ते त्याला शोधत नाही.

11एफ्राहम कबुतरा सारखा भोळा व भावनाहीन आहे, तो मिसराला हाक मारतो, नंतर अश्शूरास उडून जातो.

12जेव्हा ते जातील, मी आपले जळि त्यांच्यावर टाकेल, आकाशतल्या पक्षांप्रमाणे मी त्यांना खाली आणिल, लोकांच्या समुदायामध्ये मी त्यांना शिक्षा करीन.

13हाय, त्यावर! कारण ते मजपासून बहकुले आहेत. त्यांच्यावर नाश येत आहे! त्यांनी माझ्याविरुध्द फितुरी केली आहे मी त्यांची सुटका केली असती पण त्यांनी माझ्या विरोधात लबाडी केली आहे.

14त्यांनी त्यांच्या हृदयापासून माझा धावा केला नाही, परंतू ते पलंगावर पडून धान्य व नव्या द्राक्षरसासाठी बिलाप करतात, ते माझ्यापासून बहकुले आहेत.

15जरी मी त्यास शिक्षण दिले आणि त्यांना बाहुबल दिले, आता ते माझ्या विरोधात कट रचतात.

16ते परत फिरतात, पण ते मी जो सर्वोच्च आहे, त्याकडे फिरत नाही, ते फसव्या धनुष्यासारखे झाले आहेत, त्यांचे अधिकारी आपल्या जिभेच्या उन्मतपणामुळे तलवारीने पाडले जातील, मिसरात त्यांची थट्टा करण्यात येईल.



 <<  Hosea 7 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran