Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Hosea 3 >> 

1यहोवा मला म्हणाला, परत जा, आणि अशा स्त्रीवर प्रेम कर जी दुराचारी असूनही आपल्या पतीस प्रिय आहे. तिच्यावर प्रेम कर जसे मी इस्त्राएल लोकांवर करतो जरी ते इतर देवतांकडे वळले आणि त्यांना मनुक्याची ढेप प्रिय वाटली.

2म्हणून मी पंधरा चांदीचे तुकडे व दिड मण जव देऊन तिला माझ्यासाठी विकत घेतले.

3मी तिला म्हणालो, खुप दिवस तू माझ्यासोबत राहा यापुढे तू वेश्या नाही वा परपुरुषाची नाही, त्याचप्रकारे मी पण तुझ्याशी वागेन.

4कारण इस्त्राएलचे लोक बरेच दिवस राजा, सरदार, बलीदान, दगडी खांब, एफोद आणि गृहदेवता ह्यांवाचून राहतील.

5नंतर इस्त्राएलाचे लोक परत येतील व आपल्या देव यहोवा आणि राजा दावीद यांना शोधतील आणि शेवटच्या दिवसात, ते यहोवाच्या समोर त्याच्या चांगुलपनात भितीने कापत येतील.



 <<  Hosea 3 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran