Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Hosea 14 >> 

1हे इस्त्राएला, आपला देवा यहोवा याकडे परत ये, तुझ्या दुष्टपणामुळे तुझे पतन झाले आहे.

2कबुलीच्या शब्दासोबत देवाकडे वळा, त्याला म्हणा, आमचे अधर्म दूर कर आणि दयेने आमचा स्विकार कर म्हणजे आम्ही तुझी स्तुती करु, आपल्या ओठांचे फळ तुला अर्पू.

3अश्शूर आम्हास तारणार नाही, आम्ही युध्दासाठी घोडयावर स्वार होणार नाही, यापुढे आमच्या हाताच्या मुर्तीस आमचा देव म्हणणार नाही, कारण तुझ्यामध्ये अनाथांना दया प्राप्त होते.

4मी ज्यांनी सोडले ते जर परत मजकडे आले तर मी त्यांना आरोग्य देईल, त्यांच्यावर मोकळया मनाने प्रिती करीन, कारण माझा त्यांच्यावरचा राग गेला आहे.

5मी इस्त्राएलास दवा सारखा होईल, तो भुकमळासारखा फुलेल आणि लबानोनात देवदारु प्रमाणे मुळ धरील.

6त्याच्या फांद्या पसरतील, त्याची सुंदरता जैतुन वृक्षासारखी होईल, आणि त्याचा सुगंध लबानोनातील देवदार वृक्षासारखा होईल.

7त्याच्या सावलीत राहणारे लोक परत येतील ते धान्यासारखे पुनर्जिवित होतील आणि द्राक्षाप्रमाणे फळ देतील, त्याची प्रतिष्ठा लबानोनाच्या द्राक्षरसासारखी होईल.

8एफ्राहम म्हणेल, ह्या मुर्त्याचे मी काय करु? मी त्यास उत्तर देईन त्याची काळजी घेईल मी सारखा सदाहरित आहे, माझ्यातून तुला फळ मिळते.

9कोण चतुर आहे ज्याला ह्या गोष्टी समजतील? कोण समंजस आहे ज्याला ते समजेल? यहोवाचे मार्ग सरळ आहेत आणि धार्मिक त्यात चालतील पण बंडखोर त्यात अडखळून पडतील.



 <<  Hosea 14 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran