Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Hosea 13 >> 

1एफ्राईम बोलत असे तेव्हा लोकांचा थरकाप होई; तो इस्राएलाचा सरदार झाला; पण पुढे बआलमूर्तीमुळे दोषी होऊन तो लोपला.

2आता ते अधिकाधिक पाप करु लागले ते चांदीच्या ओतीव मुर्त्या आपल्या कुशलतेने कारागीर बनवतो तसे बनवू लागले. लोक म्हणू लागले, “जे बलिदान करतात त्यांनी वासरांचे चुंबन घ्या”

3म्हणून ते पहाटेच्या ढगासारखे लवकर उडून जाणाऱ्या दवासारखे खळयातून वाऱ्याने उडणाऱ्या भुसासारखे आणि धुराडयातून उडणाऱ्या धुरासारखे ते होतील.

4पण मी तुमचा देव यहोवा आहे, ज्याने तुम्हाला मिसरातून बाहेर काढले, माझ्याशिवाय तुम्हाला अन्य देव नाही, माझ्याशिवाय कोणी तारक नाही.

5मी तुम्हाला रानात, रुक्ष प्रदेशात जानुन होतो.

6जेव्हा तुम्हाला गायरान मिळाले तेव्हा तुम्ही तृप्त झालात आणि जेव्हा तुमचे पोट भरले तेव्हा हृदय उन्मत्त झाले त्या कारणास्तव तुम्ही मला विसरले.

7म्हणून मी सिंहासारखा तुमच्याशी वागेल, चित्याप्रमाणे तुमच्या वाटेवर दबा धरुन बसेल.

8जिची पिल्ले चोरी झालीत अशा अस्वली सारखा मी तुमच्यावर हल्ला करीन, मी तुमचे उर फाडीन, आणि मादा सिंहाप्रमाणे तुम्हाला खाऊन टाकेन, जसा वनपशु तुम्हाला फाडून टाकतो.

9इस्त्राएला हा तुझा नारा आहे जो येत आहे कारण तू माझ्या म्हणजे तुझ्या सहाय्यकर्त्यांच्या विरोधात गेला आहेस.

10तुझा राजा कोठे आहे? जो तुझ्या सर्व नगरांचे रक्षण करतो तुझे अधीपती कोठे आहेत? ज्याविषयी तू मला म्हटले, “मला राजा आणि अधिपती दे?”

11मी क्रोधाने तुला राजा दिला आणि रागाने त्याला काढूनही घेतले.

12एफ्राहमाचा अन्याय गोळा केला आहे, त्याच्या अपराधाची रास करण्यात आली आहे.

13प्रसूतिवेदना त्याच्यावर येतील, पण तो अक्कलशुन्य मुलगा आहे, कारण जन्म घेण्याच्या वेळी तो गर्भातून बाहेर येत नाही.

14मी त्यांना खरोखर शालोआच्या बळापासून सोडवले काय? मी त्यांना खरोखर मरणातून सोडवणार काय? मरणा तुझ्या महामाया कोठे? आन ते इथे कळवळा माझ्या समोरुन लपलेला आहे.

15एफ्राहम आपल्या भावांमध्ये जरी प्रगत झाला, पुर्वेचा वारा येईल, यहोवाचा वारा रानातून येईल एफ्राहमाचा झरा सुकून जाईल, त्याच्या विहिरीत पाणी राहणार नाही. त्यांचा शत्रु त्याच्या सर्व मौल्यवान वस्तू लुटून नेईल.

16शमरोनात दोष येईल, कारण तिने देवाविरुध्द बंड केला आहे ते तलवारीने पडतील. त्यांची लहान मुले आपटली जातील आणि त्यांच्या गर्भवती स्त्रिया चिरुन टाकण्यात येतील.



 <<  Hosea 13 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran