Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Hosea 10 >> 

1इस्त्राएल एक जोमाने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे. त्याला विपुल फळे येतात. जसजसे त्यांची फळ वाढली तसतशी त्याने वेदया बांधल्या. त्यांची भूमी सुपीक झाली, तो त्याने सुंदर स्तंभ उभारले.

2त्यांचे हृदय कपटी आहे, त्यांना त्यांची शिक्षा होईल यहोवा त्यांच्या वेदया मोडून टाकेन त्याच्या पवित्र स्तंभाचा नाश करेल.

3आता ते म्हणतील, “आम्हाला राजा नाही, कारण आम्ही यहोवाचे भय मानले नाही आणि राजा आमच्यासाठी काय करणार?”

4ते पोकळ शब्द बोलतात खोटया शपथा वाहून करार करतात, म्हणून जसे शेताच्या तासात विषारी रानटी झुडूप उगवतात तसा त्यांच्यावर न्याय येईल.

5शोमरोनाचे रहिवासी बेथआवेनच्या वासरांसाठी घाबरे होतील त्यांचे लोक त्यांच्यासाठी बिलाप करतील, सोबतच त्यांचे मुर्तीपुजक पुजारी जे त्याच्या वैभवावर आनंद करत होते आता ते त्यांच्याबरोबर नाही.

6ते अश्शूरास त्यांच्या महान राजासाठी भेट म्हणून नेण्यात येतील. एफ्राहम लज्जीत होईल, आणि मुर्तीच्या सल्ल्याने वागल्यामुळे इस्त्राएल लज्जीत होईल.

7शमरोनाचा राजा पाण्यावर तरंगणाऱ्या ढलण्यासारखा नाश पावेल.

8दुष्टतेची श्रध्दास्थानाने आणि इस्त्राएलाचे पाप नाश पावतील त्यांच्या वेदींवर काटे व काटेरी झुडपे उगवतील. लोक पर्वतास म्हणतील, “आम्हाला झाक” आणि टेकडयास म्हणतील, “आमच्यावर पड”

9इस्त्राएला गिबाच्या दिवसापासून तू पाप करत आहेस, तू तिथेच राहिला आहेस काय ते गिबाच्या दुष्टासोबत लढाईत कसले नाही?

10मला वाटेल तेव्हा मी त्यास शिस्त लावीन, त्यांच्या विरोधात राष्ट्रे एकत्र येतील व त्यांच्या दोन्ही पापांसाठी त्यांना बेडया टाकतील.

11एफ्राहम ही प्रशिक्षित कालवड आहे तीला मळणी करायला आवडते म्हणून मी तीच्या गोऱ्या मानेवर जु ठेवीन. मी एफ्राहमावर जु ठेवीन, यहूदा नांगरील, याकोब ढेकळे फोडीन.

12तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा आणि कराराच्या विश्वासूपणाची फळ कापाल तुमची पडीत भूमी नांगरुन काढा, कारण ही वेळ यहोवाला शोधण्याचीच आहे, जोपर्यंत तो येऊन धार्मिकतेचा पाऊस पाडत नाही.

13तुम्ही दुष्टतेची नांगरणी केली, तुम्ही अन्यायाची कापणी केली, तुम्ही फसवणूकीचे फळ खाल्ले कारण तू तुझ्या योजनांवर आणि तुझ्या पुष्कळ सैनिकांवर विश्वास ठेवला.

14म्हणून तुझ्या लोकांमध्ये युध्दाचा गलबला होईल आणि तुझी सर्व तटबंदीची शहरे नष्ट होतील हे असे घडेल जसे शल्मानाने बंध आर्बिलाच्या युध्दात नाश केला तेव्हा आईला मुलांसह आपटून मारले गेले.

15बेथेल तुझ्या अति दुष्टपणामुळे असे तुझ्यासोबत घडेल. प्रभातसमयी इस्त्राएलाचा राजा पुर्णपणे नाश पावील.



 <<  Hosea 10 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran