Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Judges 17 >> 

1एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात एक माणूस होता; त्याचे नाव तर मिखा.

2आणि त्याने आपल्या आईला म्हटले, जे अकराशे शेकेल चांदीची नाणी तुझ्याजवळून घेतली होती, आणि ज्यामुळे तू मला शाप दिला होता आणि ज्याबद्दल तु माझ्या जवळ बोलत होती पाहा ते चांदीचे नाणे माझ्या जवळ आहेत; मीच ते घेतले होते. त्याची आई म्हणाली, हे माझ्या मुला, परमेश्वर तुला आशीर्वाद देवो.

3मग त्याने ते अकराशे शेकेल चांदी आपल्या आईला परत दिली; तेव्हां त्याच्या आईने म्हटले, मी आपल्या मुलासाठी कोरीव लाकडी मूर्ति व ओतीव धातूची मूर्ति करावयास आपल्या हाताने ही चांदी परमेश्वराला अर्पण करून दिले होते; तर आता मी हे तुला माघारे देते.

4तथापि त्याने ती चांदीचे नाणे आपल्या आईला माघारे दिले, मग त्याच्या आईने दोनशे शेकेल चांदी घेऊन ते सोनाराला दिली, आणि त्याने त्याची कोरीव व ओतीव मूर्ति केली; नंतर ती मिखाच्या घरी ठेवली.

5मिखा माणसाचे मूर्तिचे घर होते, आणि त्याने याजकाचे एफोद व घरगुती देव केले होते; आणखी त्याने आपल्या एका मुलाचे याजक म्हणून समर्पण केले होते.

6त्या दिवसांत इस्त्राएलावर कोणी राजा नव्हता; प्रत्येकाने आपापल्या दिसण्यांत जे योग्य, ते केले.

7तेव्हा यहूदातील बेथलेहेमातला यहूदी घराण्यतला तरूण लेवी तेथे आपले कर्तव्य पार पाडत राहत होता.

8नंतर तो माणूस यहुदातल्या बेथलेहेम नगरांतून निघाला, आपल्याला राहण्यास कोठे जागा मिळेल शोधू लागला. प्रवास करत एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मिखाच्या घरापर्यंत आला.

9मग मिखा त्याला म्हणाला, तू कोठून आलास? तेव्हा तो माणूस त्याला म्हणाला, बेथलेहेमतला यहूदी लेवी मी आहे; आणि मला राहण्यासाठी जागा मिळावी म्हणून मी प्रवास करत आहे.

10तेव्हा मिखा त्याला म्हणाला, तू माझ्या बरोबर राहा आणि माझा सल्लागार व याजक असा हो. म्हणजे मी तुला प्रती वर्षी दहा चांदीचे तुकडे व एक पोशाख व तुझे अन्न देईन. मग तो लेवी आंत गेला.

11आणि तो लेवी त्या सामग्रीसह त्या माणसा बरोबर राहण्यास तयार झाला; तसा तो तरूण त्याच्याजवळ त्याच्या एका पुत्रासारखा झाला.

12आणि मीखाने त्या लेवीला पवित्र कर्तव्य करण्यास वेगळा केले, आणि तो तरूण त्याचा याजक झाला आणि तो मिखाच्या घरी राहिला.

13नंतर मिखा बोलला, आता मला कळले की परमेश्वर माझे चांगले करील, कारण हा लेवी माझा याजक झाला आहे.



 <<  Judges 17 >> 


Bible2india.com
© 2010-2026
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran