Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Daniel 12 >> 

1त्यावेळी मीखाएल जो तुझा लोकांचा मोठा अधिपती आहे, उठेल ती संकटाची अशी वेळ राहील जी कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून आली नाही त्यावेळी ज्याचे नाव त्या पुस्तकात आहे ते सर्व तुझे लोक तारले जातील.

2अनेक लोक जे मातीत निजलेले आहेत ते काही सार्वकालीन जिवनासाठी तर काही सार्वकालीन लज्जा आणि तिरस्कार मिळविण्यास उठतील.

3जे सुज्ञ ते आकाशातील प्रकाशासारखे चकाकतील आणि जे पुष्काळास न्यायीपणाकडे वळवणारे सदासर्वदा ताऱ्याप्रमाणे चमकतील.

4पण तू दानीएला, ही वचने आणि पुस्तकाचे रहस्य गुप्त ठेव, अगदी अंतसमयापर्यंत अनेक लोक इकडे तिकडे धावतील आणि ज्ञान वाढत जाईल.

5मग मी दानीएलाने पाहिले आणि तिथे दोघे उभे होते एक नदीच्या ह्या काठवर उभा होता आणि दुसरा पलिकडील काठावर उभा होता.

6त्यापैकी एकाने तागाची वस्त्रे घातलेल्यास विचारले जो नदीच्या पाण्यावर होता ह्या अद्भुत गोष्टीचा अंत होण्यास किती वेळ लागेल?

7मी त्याची वाणी एकेली जो तागाची वस्त्रे घातलेला पुरुष नदीतल्या जलांच्या वरती होता, त्याने आपला उजवा व डावा हात आकाशावर करून म्हणाला जो सदाजीवीत आहे त्याची शपथ वाहून म्हटले, एक समय, दोन समय आणि अर्था समय, साडे तीन वर्ष जेव्हा पवित्र जनाचा बलाचा चुराडा होईल तेव्हा हे पूर्ण करण्यात येईल. हे त्याने म्हणणे माझ्या कानी पडले.

8मी ऐकले, पण मला समजले नाही तेव्हा मी विचारले, “माझ्या स्वामी, हयाचा परिणाम काय?”

9तो म्हणाला, दानीएला स्वस्थ रहा, कारण ही वचने सिलबंद करून अंतसमयापर्यंत गुप्त ठेवण्यात आली आहे.

10पुष्कळ शुध्द, स्वच्छ आणि पवित्र केले जातील पण दुष्ट दुष्टपणा करतील दृष्टापैकी कोणास समजणार नाही पण जे ज्ञानी ते समतील.

11रोजचा बलिहवन ह्या वेळेपासून बंद करण्यात येईल आणि नाशदायी अमंगळाची स्थापना होईल तेव्हापासून 1,290 दिवस लोटतील.

12जो धीराने 1,335 वाट पाहील तो धन्य.

13तू आपल्या मार्गाने अंतापर्यंत जा, तू तुझे वतन प्राप्त करायला शेवटच्या दिवसात उठविला जाशील.



 <<  Daniel 12 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran