Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Numbers 34 >> 

1परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,

2इस्त्राएल लोकांना ही आज्ञा दे आणि त्यांना सांग, तुम्ही कनान देशात येत आहात. तुम्ही त्या देशाचा पराभव करा. तुम्ही सर्व कनान देश घ्या.

3दक्षिणेकडे अदोमाजवळच्या त्सीन रानाचा काही भाग तुम्हाला मिळेल. तुमची दक्षिणेकडची सीमा मृत समुद्राच्या दक्षिण टोकापासून सुरु होईल.

4तेथून अक्रब्बीम चढावाचे दक्षिण टोक पार करून ती त्सीन रानातून कादेश-बर्ण्याला जाईल. आणि नंतर हसर-अद्दारपर्यंत जाऊन असमोनाला पोहोचेल.

5असमोनाहून ती मिसर देशाच्या नदीपर्यंत जाईल आणि समुद्रात तिची समाप्ती होईल.

6तुमची पश्चिमेकडची सीमा म्हणजे महासमुद्र व त्याचा किनारा राहिल तीच तुमची पश्चिम सीमा आहे.

7तुमची उत्तरेकडची सीमा महासमुद्रात सुरु होईल व होर पर्वताकडे एक रेषा आंखावी.

8होर पर्वतावरुन ती लेबो हमाथाला जाईल व तेथून सदादला.

9नंतर ती सीमा जिप्रोनला जाईल व हसर-एनानला ती संपेल. तेव्हा ती तुमची उत्तर सीमा.

10तुमची पूर्व सीमा हसर-एनानजवळ सुरु होईल व ती शफामपर्यंत जाईल.

11शफामपासून ती अईनाच्या पूर्वेकडे रिब्लाला जाईल. ती सीमा उतरत किन्नेरेथ समुद्राच्या पूर्वेकडील किनाऱ्याच्या पर्वतांच्या रांगापर्यंत जाईल.

12आणि नंतर ती यार्देन नदीच्या काठाने जाऊन मृतसमुद्रात तिची समाप्ती होईल. तुझ्या देशाच्या या सीमा आहेत.

13तेव्हा मोशेने इस्त्राएल लोकांना आज्ञा केली व म्हणाला की, चिठ्या टाकून ज्या देशाचे वतन तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे साडे नऊ वंशाना जो देश देण्याचे परमेश्वराने देण्याचे ठरविले आहे तो हाच.

14रऊबेन आणि गादची वंश आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशानी आधीच त्यांचे वतन घेतले आहे.

15त्या अडीच वंशानी यरीहोजवळ यार्देन नदीच्या पूर्वेकडचे वतन मिळाले आहे.

16नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,

17जो पुरुष हा देश तुम्हाला वतन म्हणून वाटून देणार आहे तो याजक एलाजार आणि नूनाचा मुलगा यहोशवा.

18प्रत्येक वंशाचा एक प्रमुख वतन म्हणून देशाची विभागणी करण्यास घ्यावा.

19त्या मनुष्यांची नावे ही आहेत यहूदाच्या वंशातला, यफुन्नेचा मुलगा कालेब.

20शिमोनाच्या वंशातील, अम्मीहुदाचा मुलगा शमुवेल.

21बन्यामिनाच्या वंशातील, किसलोनाचा मुलगा अलीदाद.

22दानी वंशातील, सरदार यागलीचा मुलगा बुक्की.

23योसेफाच्या वंशातील, सरदार मनश्शेच्या वंशातील, एफोदाचा मुलगा हन्नीएल.

24एफ्राईम वंशातील, सरदार शिफटानाचा मुलगा कमुवेल.

25जबुलून वंशातील सरदार पर्नाकचा मुलगा अलीसाफान.

26इस्साखार वंशातील सरदार अज्जानाचा मुलगा पलटीयेल.

27आशेरी वंशातील सरदार शलोमीचा मुलगा अहीहूद.

28आणि नफताली वंशातील सरदार अम्मीहुदाचा मुलगा पदाहेल.

29परमेश्वराने कनानाच्या भूमीची इस्त्राएल लोकांमध्ये वाटणी करण्यासाठी या माणसांची निवड केली.



 <<  Numbers 34 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran