Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Numbers 17 >> 

1परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,

2इस्त्राएल लोकांशी बोल. त्यांच्याकडून बारा काठ्या घे. बारा वंश प्रमुखांकडून प्रत्येकी एक काठी घे. प्रत्येक माणसाचे नाव त्यांच्या त्यांच्या काठीवर लिही.

3“लेवीच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही. प्रत्येक वंश प्रमुखासाठी एकेक काठी असलीच पाहिजे.

4या काठ्या दर्शनमंडपात आज्ञापटाचा कोशाच्या वेदीजवळ ठेव. हीच मी तुला भेटण्याची जागा आहे.

5खरा याजक म्हणून मी एका माणसाची निवड करीन. मी कोणाची निवड केली ते तुला कळेल कारण त्याच्या काठीला पालवी फुटायला लागेल. याप्रमाणे मी इस्त्राएली तुझ्या आणि माझ्याविरुद्ध तक्रारी करतात ते बंद पाडीन.”

6म्हणून मोशे इस्त्राएलाच्या लोकांशी बोलला. प्रत्येक वंश प्रमुखाने त्याला काठी दिली. त्या बारा काठ्या होत्या. प्रत्येक वंश प्रमुखाकडून एकेक काठी आली. एक काठी अहरोनाची होती.

7मोशेने त्या काठ्या साक्षपटाच्या तंबूत परमेश्वरासमोर ठेवल्या.

8दुसऱ्या दिवशी मोशेने साक्षपटाच्या तंबूत गेला. लेवी वंशाकडून आलेल्या अहरोनाच्या काठीला पाने फुटली असल्याचे त्याला दिसले. त्या काठीला फांद्याही फुटल्या होत्या आणि बदामही लागले होते.

9म्हणून मोशेने परमेश्वराच्या जागेतून सगळ्या काठ्या आणल्या. मोशेने त्या काठ्या इस्त्राएल लोकांना दाखवल्या. त्या सर्वांनी काठ्यांकडे पाहिले आणि प्रत्येकाने आपली काठी परत घेतली.

10नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाची काठी परत मंडपात आज्ञापटाचा कोशाजवळ ठेव. जे लोक नेहमी माझ्याविरुद्ध बंड करतात त्यांच्यासाठी ही अपराधाची खूण असेल. माझ्याविरुद्ध तक्रारी करणे ती यामुळे बंद होईल म्हणजे ते मरायचे नाहीत.

11मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले.

12इस्त्राएलाचे लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरणार आहोत हे आम्हाला माहित आहे आम्ही हरलो आहोत. आमचा सगव्व्यांचा नाश होणार आहे.

13जो कोणी माणूस नुसता परमेश्वराच्या निवासमंडपाजवळ जाईल तो मरेल. आम्हा सर्वाचा नाश होणार की काय ?”



 <<  Numbers 17 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran