Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Job 26 >> 

1नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला,

2“बलहिन असलेल्यास तू कसे साहाय्य केले, शक्तीनसलेल्या बाहूंना तू कसे सोडविले.

3बुध्दीनसलेल्यास तू कसा सल्ला दिलास, आणि तू त्याला केवढे ज्ञान कळविले.

4तू कोणाच्या साह्यायाने हे शब्द बोललास? तुझ्यातुन कोणाचे मन प्रगट झाले.

5बिल्ददने उत्तर दिले, मृत झालेल्याची प्रेते जलनिधीच्या खाली निर्जनस्थळी थरथरा कापत आहेत.

6देवापुढे अधोलोक नग्न आहे, त्याच्यापुढे विनाशस्थान स्वत:ला झाकुण घेवू शकत नाही.

7त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शुन्य आकाशावर पसरवले आहे, आणि त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे.

8तिच्या गडद मेघात तो पाणी बांधुन ठेवतो, तरी त्याच्या ओझ्याने मेघ फाटत नाही.

9तो चंद्राचा चेहरा झाकतो आणि त्यावर आपले मेघ पसरवितो.

10त्याने पाण्याच्या पृष्ठभागावर एक वर्तुळाकार सिमा कोरली आणि प्रकाश व अंधकार यांच्यामध्ये क्षितीजरेखा आखली.

11त्याच्या धमकीने आकाशस्तंभ थरथरतात आणि भयचकीत होतात.

12तो आपल्या सामर्थ्याने समुद्र स्थिर करतो, तो आपल्या ज्ञानबलाने राहाबाला छिन्नभिन्न करतो.

13त्याचा नि:श्वास आकाशातील वादळ स्वच्छ करतो त्याच्या हातांनी पळून जाणाऱ्या सापाला नष्ट केले.

14पाहा, ह्या त्याच्या मार्गाचा केवळ कडा आहे, किती हळूवार आम्ही त्याचे ऐकतो! परंतू त्याच्या बलाची गर्जना कोण समजू शकेल?”



 <<  Job 26 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran