Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Job 23 >> 

1नंतर ईयोबने उत्तर दिले व तो म्हणाला,

2“तरीही मी आज कडवटपणे तक्रार करीन? कारण माझा त्रास माझ्या विलापाहून भारी आहे.

3देवाला कुठे शोधावे ते मला माहीत असते तर मी त्याच्या ठिकाणापर्यंत जाऊन पोहचलो असतो

4मी देवाला माझी फिर्याद सांगितली असती. माझ्या मुखाने सतत वाद घातला असता.

5त्याने माझ्या युक्तिवादाला कसे प्रत्युतर दिले असते ते मला कळले असते. तो मला काय म्हणाला ते मी लक्षात घेतले असते.

6त्याच्या महान सामर्थ्याने त्याने माझ्याविरुध्द वाद केला असता का? नाही; तर त्याने माझ्याकडे लक्ष दिले असते.

7तेथे सरळ माणसांनी त्याच्याशी वाद केला असता. म्हणजे मी माझ्या न्यायाधीशापासुन सुटलो असतो.

8पाहा, मी पूर्वेकडे गेलो, पण तो तीथे नव्हता, मी पश्चिमेकडे गेलो, पण मी त्याला पाहीले नाही.

9उत्तरेकडे तो कार्य करीत असला, तरी मला तो दिसू शकत नाही. आणि दक्षिणेकडेही, जेथे तो स्वतःस लपवितो त्यामुळे तेथेही तो मला दिसत नाही.

10परंतु माझा मार्ग त्याला कळाला आहे, जेव्हा तो माझी परीक्षा घेतो, तेव्हा मी सोन्यासारखा असेन.

11त्याच्या पावलावर माझी पावले पडत आहेत, मी त्याचा मार्ग धरला आहे व त्यापासुन वळालो नाही.

12मी त्याच्या ओठांच्या आज्ञेचे पालन करण्यापासुन मागे वळालो नाही, मी संपत्ती प्रमाणे माझ्या ह्दयात देवाच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द ठेवले आहेत.

13परंतु देव कधी बदलत नाही, त्याला कोण बदलेल. त्याच्या मनाच्या ईच्छेप्रमाणे तो करतो.

14कारण तो माझ्यासाठी त्याचा हूकुम चालवितो, माझ्यासाठी त्याच्या बऱ्याच योजना आहेत.

15यास्तव, मी त्याच्या उपस्थीतीला घाबरतो, जेव्हा मी त्याच्याबद्दल विचार करतो, मला त्याची भीती वाटते.

16त्यामुळे देवाने माझे हृदय कमजोर केले आहे, आणि सर्वशक्तीमानाने मला भयभीत केले आहे.

17काय मी अंधकाराने काढून टाकला गेलो नाही काय? आणि गडद अंधकाराने माझे मुख झाकले गेले नाही काय.”



 <<  Job 23 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran