Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Job 14 >> 

1“माणव स्त्री पासून जन्मलेला आहे. आपले आयुष्य अगदी कमी आणि कष्टांनी भरलेले आहे.

2तो फुलासारखा फुलतो व खुडल्या जातो, त्याचे आयुष्य छायेसारखे आहे ती थोडा वेळ असते आणि नंतर नाहीशी होते.

3अशाकडे तुझे डोळे लागतील काय? अशा मला तू आपल्या न्यायसनासमोर नेतोस काय?

4अशुद्धांतून शुद्ध पदार्थ कोण काढील? कोणीही नाही.

5माणसाचे आयुष्य मर्यादित आहे, माणसाने किती जगायचे ते तूच ठरवतोस. तूच त्याची मर्यादा निश्चित करतोस आणि ती तो बदलू शकत नाही.

6तू त्याजवर नजर ठेवणे बंद कर, म्हणजे त्याला शांती मिळेल, मजुर जसे रोज भरतो तसे त्याला त्याचे दिवस भरू दे म्हणजे तो आनंद पावेल.

7वृक्षाला तोडून टाकले तरी त्याच्याबाबतीत आशा असते. ते पुन्हा वाढू शकते त्याला नवीन फांद्या फुटतच राहतात.

8त्याची मुळे जरी जमिनीत जुनी झाली आणि त्याचे खोड जमिनीत मरुन गेले.

9तरी ते पाण्यामुळे पुन्हा जिवंत होते. आणि त्याला नवीन रोपासारख्या फांद्या फुटतात.

10परंतु माणूस मरतो आणि तो संपतो. खरोखर माणूस मरतो तेव्हा तो कोठे जातो.

11जसे तलाव पाण्याशिवाय सुकून जातात, तसे नदी पाण्याशिवाय आटते.

12माणूस मरतो तेव्हा तो झोपतो आणि पुन्हा कधीही उठत नाही. आकाश नाहीसे होईपर्यंत मेलेला माणूस उठणार नाही. मनुष्यप्राणीत्या झोपेतून कधी जागा होत नाही.

13तू मला अधोलोकापासून लपव, संकटा पासून वाचव, आणि तुझा राग निवळेपर्यंत तू मला तिथे लपवावेस. नंतर तू माझी मदत नियमित करून माझी आठवण करशील तर किती बरे होईल.

14मेलेला माणूस पुन्हा जिवंत होऊ शकतो का? मी माझी सुटका होईपर्यंत वाट बघत राहीन.

15तू मला हाक मारशील आणि मी तुला उत्तर देईन. मग जे तू मला निर्माण केलेस तो मी तुला महत्वाचा वाटेन.

16पण सध्या तू माझे प्रत्येक पाऊल मोजीत आहेस व माझ्या प्रत्येक पापा वर नजर ठेवीत आहेस.

17तू माझी पापे एखाद्या पिशवीत बांधून ठेवली आहेत, माझे पाप झाकून ठेवीली आहेस.

18डोंगर पडतात आणि नष्ट होतात. मोठमोठे खडक जागीच फुटतात.

19खडकावरुन वाहणारे पाणी त्यांची झीज करते. पुरामुळे जमिनीवरची माती वाहून जाते. त्याचप्रमाणे माणसाची आशा नष्ट होते.

20तू नेहमीच त्याचा पराभव करतोस, तू तेथून निघून जातोस. तू त्याला दु:खी करतोस आणि त्यालामरणा साठी सोडून देतो

21त्यांच्या मुलांना बहुमान प्राप्त झाला तर ते त्याला समजत नाही. त्याच्या मुलांनी काही चुका केल्या तर त्या त्याला कधी दिसत नाहीत.

22फक्त त्याच्या स्वत:च्या शारीरिक दु:खाची जाणीव असते. आणि त्याचे अतंर्याम केवळ स्वत:साठी रडते.”



 <<  Job 14 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran