Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Proverbs 9 >> 

1ज्ञानाने आपले स्वतःचे घर बांधले; त्यात तिने खडकाचे सात खांब कोरून तयार केले.

2तिने रात्रीच्या भोजनासाठी आपले पशु तयार केले आहेत; तिने आपला द्राक्षारस मिसळला आहे; आणि तिने मेजहि वाढून तयार केलेत. तिने अन्न तिच्या टेबलावर ठेवले.

3तिने आपल्या दासीकरवी आमंत्रण पाठवले आहे आणि ते नगराच्या उंचस्थानांच्या टोकापासून हाक मारून म्हणतेः

4“जो अज्ञानी आहे तो इकडे येवो!” ती जे बुद्धिहीन आहेत त्यांना म्हणते.

5“या, माझे अन्न खा. आणि मी मिसळलेला द्राक्षारस प्या.

6तुमचे अज्ञानाचे मार्ग मागे सोडा आणि जिवंत रहा; सुज्ञानाच्या मार्गाने चला.”

7जो निंदकाला सुबोध करतो तो अप्रतिष्ठेला आंमत्रण करतो, आणि जो दुर्जन माणसाला बोल लावतो तो आपले नुकसान करून घेतो.

8निंदकाला बोल लावू नको किंवा तो तुझा द्वेष करेल; ज्ञान्यास बोल लाव आणि तो तुझ्यावर प्रेम करील.

9ज्ञानी माणसाला शिक्षण दे आणि तो ज्ञानात अधिक वाढत जाईल; नीतिमान माणसाला शिक्षण दे आणि तर तो शिक्षणात अधिक वाढेल.

10परमेश्वराचे भय ज्ञानाचा उगम आहे, आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता आहे.

11कारण माझ्यामुळे तुझे दिवस बहुगुणित होतील, आणि तुमच्या आयुष्याची वर्षे वाढतील.

12जर तुम्ही ज्ञानी असलास, तर तू आपणासाठी ज्ञानी असशील, पण जर तू निंदा केली तर तूच मात्र तिचे फळ भोगशील.

13मूर्ख स्त्री गोंगाट करणाऱ्यासारखी आहे ती अज्ञानी आहे आणि तिला काही कळत नाही.

14ती तिच्या घराच्या दाराजवळ बसते, ती नगरातल्या उंचस्थानी आसनावर बसते.

15जे लोक आपल्या वाटेने सरळ चालतात, जवळून जाणाऱ्यांना ती हाक मारून म्हणते,

16“जो कोणी अज्ञानी आहे तो इकडे येवो!” जो कोणी बुद्धिहीन आहे त्याला ती म्हणते.

17“चोरलेले पाणी गोड लागते, आणि गुप्तपणे खाल्लेली भाकर चांगली लागते.”

18पण तेथे मेलेले आहेत हे त्यांना समजत नाही, तिचे पाहुणे मृतलोकाच्या खोल स्थानात आहेत हे त्याला माहीत नाही.



 <<  Proverbs 9 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran