Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  2 Chronicles 27 >> 

1योथाम राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेवर सोळा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यरुशा ती सादोकची मुलगी.

2योथाम परमेश्वराच्या दृष्टीने उचित तेच करीत असे. आपले वडील उज्जीया यांच्याप्रमाणेच तो परमेश्वराच्या आज्ञेत राहिला. पण त्याचे वडील जसे परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळायला गेले तसे मात्र त्याने केले नाही. लोकांचे वाईट मार्गाने जाणे चालूच होते.

3परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा योथामने पुन्हा करवला. ओफेलच्या कोटावर त्याने बरेच बांधकाम केले.

4यहूदाच्या डोंगराळ प्रदेशात नगरे वसवली. जंगलात किल्ले आणि बुरुज बांधले.

5अम्मोन्यांचा राजा आणि त्यांचे सैन्य यांच्यावर योथामने चढाई केली आणि त्यांचा पराभव केला. त्यामुळे पुढील तीनवर्षे अम्मोनी योथामला शभंर किक्कार चांदी, दहा हजार कोर गहू आणि तेवढेच जव दरवर्षी देत असत.

6परमेश्वर देवाने सांगितल्याप्रमाणे मन:पूर्वक आचरण केल्यामुळे योथामचे सामर्थ्य वाढले.

7त्याने केलेल्या इतर गोष्टी आणि लढाया यांची हकीकत इस्राएल व यहूदा राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे.

8योथाम गादीवर आला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले.

9पुढे योथाम मरण पावला आणि त्याचे त्याच्या पूर्वंजाशजारी दफन केले गेले. दाविदनगरांत लोकांनी त्याला पुरले. योथामच्या जागी आहाज हा त्याचा मुलगा राज्य करु लागला.



 <<  2 Chronicles 27 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran