Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  1 Chronicles 20 >> 

1आणि असे झाले की, राजे लढाईला बाहेर पडतात अशावेळी म्हणजे वर्षारंभी यवाबाने सैन्य घेऊन अम्मोन्यांच्या नगरात शिरले आणि त्यांनी तो देश उद्ध्वस्त केला. मग त्यांनी राब्बा नगराला वेढा घातला. पण दावीद यरुशलेमेमध्येच राहिला. यवाबाने राब्बा नगरावर हल्ला केला व त्यांचा पराभव केला.

2दावीदाने, त्यांच्या राजाच्या डोक्यावरील मुकुट काढला. त्या सोन्याच्या रत्नजडित मुकुटाचे वजन एक मणभर होते. तो दावीदाच्या डोक्यावर ठेवण्यात आला. त्यांना त्या नगरातून मोठ्याप्रमाणात पुष्कळ लूट मिळाली.

3त्या नगरातील लोकांना बाहेर काढून त्यांच्याकडून करवती, कुऱ्हाही, लोखंडी दाताळे या हत्यारांनी करायच्या कष्टाच्या कामाला जुंपले. अम्मोन्यांच्या सर्व नगरांमध्ये दावीदाने हेच केले. मग दावीद आणि त्याचे सैन्य यरुशलेमला परतले.

4यानंतरअसे झाले की गेजेर येथे इस्राएल लोकांचे पलिष्ट्यांशी युध्द झाले. या लढाईत सिब्बखय हूशाथी याने सिप्पय याला ठार मारले. तो रेफाई वंशातला होता. व पलिष्टि लोक त्यांना शरण आले.

5पुढे पुन्हा एकदा पलिष्ट्यांशी लढाई झाली. त्यावेळी याईरचा मुलगा एलहानान याने गथच्या गल्याथचा भाऊ लहमी याला ठार केले. ज्याच्या भाल्याची काठी विणकऱ्याच्या तुळईसारखी होती.

6गथ येथे पलिष्ट्यांशी पुन्हा एकदा लढाई झाली. या गावात एक मोठा उंच माणूस होता. त्याच्या हातापायांना प्रत्येकी सहासहा, अशी एकंदर चोवीस बोटे होती. तोहि रेफाईच्या वंशातला होता.

7त्याने इस्राएल सैन्याची निंदा केली तेव्हा दावीदाचा भाऊ शिमी याचा मुलगा योनाथानाने त्याला ठार केले.

8ही गथ रेफाईच्या नगरातील संतती होती. आणि ते दावीदाच्या व त्याच्या सैन्याच्या हाताने त्यांना मारण्यात आले.



 <<  1 Chronicles 20 >> 


Bible2india.com
© 2010-2025
Help
Single Panel

Laporan Masalah/Saran