Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Zechariah 6 >> 

1मग मी वळून आणि आपले डोळे वर करून बघितले तेव्हा दोन पर्वतांमधुन चार रथ जातांना दिसले. ते पर्वत पीतळेचे होते.

2पहिल्या रथला तांबडे रंगाचे घोडे होते. दुसऱ्या रथाला काळ्या रंगाचे घोडे होते.

3तिसऱ्या रथाला पांढऱ्या रंगाचे घोडे होते आणि चौथ्या रथाला ठिपके असलेले राखाडी घोडे होते.

4मग माझ्याशी बोलणाऱ्या देवदूताला मी विचारले, “महाराज, हे काय आहे?”

5देवदूत म्हणाला, “ते चार प्रकारचे स्वर्गातले वारे आहेत. ते अखिल पृथ्वीच्या प्रभू समोर उभे होते व आता बाहेर येत आहेत.

6काळे घोडे उत्तर देशाला, पांढरे घोडे पश्चिमेला व ठिपके असलेले राखाडी घोडे दक्षिणेला जात आहेत.”

7तांबडे घोडेही बाहेर पडले, त्यांचा पृथ्वीभर फिरण्याचा कल होता. म्हणून देवदूताने त्यांना पृथ्वीवर फिरण्यास सांगितले मग ते पृथ्वीवर फिरले.

8मग त्याने मला हाक मारुन सांगितले, “बघ, उत्तरेकडे गेलेल्या घोड्यांनी आपले काम पूर्ण केले आहे. उत्तर देशात त्यांनी माझा आत्मा शांत केला आहे.”

9मग मला परमेश्वराचे वचन मिळाले. तो म्हणाला,

10बंदिवासात असलेल्या हेल्दय, तोबीया व यदया ह्यास सोबत घे. त्याच्याकडून सोने आणि चांदी घेऊन, सफन्याचा मुलगा, योशीयाच्या घरी आजच जा, ते बाबेलाहून आले आहेत.

11त्या सोन्या-चांदीपासून मुकुट घडव. तो यहोसादाकाचा मुलगा यहोशवा मुख्ययाजक याच्या डोक्यावर ठेव.

12मग त्याला पुढील गोष्टी सांग: “सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो: ‘फांदी’ नावाचा एक माणूस आहे. तो आपल्या स्थानावर उगवेल व तो परमेश्वराचे मंदिर बांधील.

13तो परमेश्वराचे मंदिर बांधेल व तो वैभवशाली होईल. स्वत:च्या सिंहासनावर बसून तो राज्य करील. तो सिंहासनावर याजकही होईल. ह्या दोन्हीमध्ये शांतीची सहमती असेल.”

14“तो मुकुट परमेश्वराच्या मंदिरात ठेवतील. हेलेम, तोबीया, यदया व सफन्याचा मुलगा हेन ह्यांचे परमेश्वराच्या मंदिरात त्यांच्या दामशूरपणाची आठवण म्हणून ठेवण्यात येईल.

15दूरवर राहणारे लोक येतील आणि परमेश्वराचे मंदिर बांधतील मग तुमची खात्री पटेल की सेनाधिश परमेश्वरानेच मला तुमच्याकडे पाठवले. जर तुम्ही लक्षपूर्वक परमेश्वराची वाणी ऐकाल तर असे होईल.”


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Zechariah 6 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran